Thu, Jun 20, 2019 14:43होमपेज › Satara › सोशल मीडियावर प्रेमोत्सवाला बहर

सोशल मीडियावर प्रेमोत्सवाला बहर

Published On: Feb 12 2018 2:07AM | Last Updated: Feb 11 2018 11:14PMसातारा : प्रतिनिधी

आताची तरुणपिढी ही सर्वच क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर  करत असून त्यामध्ये वेगवेगळे अ‍ॅप, वेबसाईट यांचा समावेश आहे. सध्या सोशल मीडियावर ‘व्हँलेटाईन डे’ चा फिव्हर असून स्टेटस, फोटो आणि व्हिडिओच्या रुपात  प्रेम प्रकट करणारी तरुणाई सध्या दिसत आहे. तरुणाईच्या प्रेमाचा दिवस म्हणून ओळखल्या जाणार्‍या 14 फेब्रुवारीच्या ‘व्हॅलेंटाइन डे’ चे वेध लागले आहे. सातार्‍यात तरूणाईच्या  प्रत्येक कट्ट्यावर सध्या ‘व्हॅलेंटाईन डे’ची चर्चा ऐकायला मिळत आहे. सोशल मीडियामुळे सध्या ‘व्हँलेटाईन डे’ चे स्वरुप बदलत चालले आहे. ऑनलाईच्या जगतात नवनवीन संकल्पनेतून आपल्या प्रिय व्यक्‍तीला इम्प्रेस करण्याचे प्रयत्न सध्या सुरु आहेत.

खरं तर मराठीतून इश्श म्हणून प्रेम करता येतं, उर्दूमध्ये इष्क म्हणून प्रेम करता येतं, व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं, कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरी प्रेम करता येतं! खरंच पाडगावकराच्या या काही ओळीच सांगून जातात प्रेमाची महती किती सुंदर आहे ती. अलिकडे या सुंदर महतीला सोशल मीडियाचे व्हास्ट असे रुप आले आहे. सध्या व्हॉटस् अ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम यासारख्या अनेक साईट्वर प्रेमोत्सवाचा बहर आला आहे. व्हॉटस् अ‍ॅपवर तर ‘व्हॅलेंटाईन डे’  जोरात सुरू आहे.

आपल्या प्रिय व्यक्‍तीसाठी स्टेटस, फोटो आणि व्हिडिओ व्हॉटस्अ‍ॅप स्टेटसला अनेक प्रेम वीर अपलोड  करताना दिसत आहे. प्रिय व्यक्‍तीला चॉकलेट, गुलाबाचे फूल प्रत्यक्षात देण्याचे धाडस आता सोशल मीडियावर देताना दिसत आहेत. तसेच सध्या व्हॉटस् अ‍ॅप, फेसबुक, मॅसेजच्या माध्यमातून शुभेच्छापत्रके पाठवणे, फेसबुकवर कविता टाकणे, सेल्फी अपलोड करणे, प्रिय व्यक्‍तीसोबतचे लोकेशन अपडेट करणे या सारख्या प्रकाराला सध्या ऊत आला असून एकूणच सध्यातरी सोशल मिडीयाचे वातावरण ‘व्हँलेटाईन डे’ मय झाले आहे.