Tue, Jul 16, 2019 01:44होमपेज › Satara › पारंपरिक रसवंती गृहातील चवच न्यारी 

पारंपरिक रसवंती गृहातील चवच न्यारी 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

उन्हाची तीव्रता जाणवू लागल्याने  सातारा शहर परिसरातील  रसवंती गृहात घुंगराची खळखळ सुरु झाली आहे. पारंपरिक हातघाण्यावरील रसवंती गृहाऐवजी इंजिनाच्या धुकधुकीत रसाचे पाट वाहत आहेत. तरीही बैलाच्या सहाय्याने ओढल्या जाणार्‍या पारंपारिक रसवंती गृहाकडे अनेकांचा कल दिसून येतो. जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. त्यामुळे शहर परिसरात रसवंती गृहाची संख्या वाढू लागली आहे. काही ठिकाणी पारंपारिक पद्धतीने उसाचा रस काढण्यासाठी हाताने ढकलायच्या घाण्याचा उपयोग केला जात आहे. परंतु अनेक रसवंतीगृहात इंजिनाची धुकधुक व घुंगरांची खळखळ सुरु असल्याचे दिसते. 

उन्हाळ्यातील फेब्रुवारी ते मे हे चार महिने व जूनमध्ये पावसाची सुरुवात होईपर्यंत रसवंती गृहे खुळखुळत असतात. शहरातील वर्दळीच्या प्रमुख ठिकाण्यावर ऊस रसाच्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळत असल्याने रसवंतीगृहावर दरवर्षीचेच ओळखीचे चेहरे दिसत आहेत. इंजिनाची धुकधुक व घुंगराची खळखळ ऐकल्यानंतर आपोआपच रसवंतीगृहाकडे नागरिकांचे पाय वळत असल्याचे दिसते. महामार्गासह अन्य ठिकाणी बैलाच्या मदतीने मोठ्या प्रमाणात रसवंतीगृह चालविली जात आहेत. या रसवंतीगृहातील रसाची चव चाखण्यासाठी ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.
 

 

 

tags : Satara,news,traditional, sugarcane, juice, teast ,rush, customers,
 


  •