Fri, Apr 26, 2019 15:18होमपेज › Satara › आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या : आमदार शिवेंद्रराजे

आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या : आमदार शिवेंद्रराजे

Published On: Jul 26 2018 5:45PM | Last Updated: Jul 26 2018 5:46PMसातारा : प्रतिनिधी

बुधवारी मराठा समाजच्यावतीने मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चा झाल्यानंतर महामार्गावर आंदोलकांनी दगडफेक, तोडफोड केली होती. हा राडा झाल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत. या संदर्भात जिल्हा मराठा समन्वयक समिती आणि आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांची भेट घेऊन आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बुधवारी जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर सातारा शहरात मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चा झाल्यानंतर महामार्गावर अचानक आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली अनेक दुकाने फोडली. यामध्ये पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह 32 पोलिस जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांवर दंगल घडवणे, जखमी करणे आणि सार्वजनिक मालमत्ता नुकसान करणे अशी कलमे लावून गुन्हे दाखल करण्यास सुरुवात झाली आहे.

त्यामुळे आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे या मागणीसाठी समनवयक समिती आणि आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी गुरुवारी सकाळी पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांची भेट घेतली.  यावेळी समितीचे पदाधिकारी आणि आ. शिवेंद्रराजे यांनी मराठा मोर्चा झाल्यानंतर आंदोलनात नसलेल्या काही आंदोलकांनी महामार्गावर तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक केली. काही समाज कंटकांनी पोलिसांवर हल्ले केले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओ शुटिंग पाहून ज्यांच्याकडून हे कृत्य करण्यात आले त्यांच्यावर कडक कारवाई करावी. मात्र ज्या मराठा आंदोलकांनी शांततेत आंदोलन केले

च्यावरील गुन्हे मागे घ्यावेत. याला  संदीप पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. दरम्यान, आंदोलकांवर गुन्हे दाखल झाल्याने मराठा समनवयक समितीने ॲड. उदय शिर्के यांना वकील म्हणून देण्यात आले आहे.