Thu, Nov 15, 2018 15:49होमपेज › Satara › शिवथरचे दोघे तडीपार 

शिवथरचे दोघे तडीपार 

Published On: Feb 14 2018 2:56AM | Last Updated: Feb 13 2018 11:02PMसातारा : प्रतिनिधी

मारामारी, जाळपोळ, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान व चोरीप्रकरणी आकाश संदीप साबळे (वय 20) व निखिल शंकर साबळे (वय 20, दोघे रा. शिवथर, ता. सातारा) यांंना जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी चार तालुक्यांतून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी, संशयित दोन्ही युवकांविरुद्ध सातारा तालुका पोलिस ठाण्यात विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत.

नुकतेच सार्वजनिक गणेशोत्सव काळात बेकायदा जमाव जमवून  दुचाकी पेटवली होती. दुचाकीवर फटाक्यांच्या माळा, बॅनर व पेट्रोल टाकण्यात आले होते. गाडी पेटवल्यानंतर संशयितांनी धारदार तलवार घेवून गाडीवर हल्‍ला केला होता. या सर्व कृत्यामुळे सार्वजनिक ठिकाणच्या शांततेचा भंग झाला होता. संशयितांना वेळोवेळी अटक करुन त्यांना सुधारण्याची संधी दिली जात होती.

मात्र त्यांच्याकडून सामान्य नागरिकांस उपद्रव होत होता. यामुळे संशयितांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी होत होती. तालुका पोलिसांनी संशयितांना तडीपार करण्यासंबंधी प्रस्ताव तयार केला व तो पोलिस अधीक्षकांकडे पाठवला. त्यानुसार मंगळवारी दोन्ही युवकांना दोन वर्षांसाठी सातारा, कोरेगाव, जावली, वाईतून तडीपार करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील आणखी काही जणांचा प्रस्ताव तयार असून लवकरच त्याबाबत सुनावणी होणार आहे.