Sat, Jul 20, 2019 02:14होमपेज › Satara › साताऱ्यातील शांतिदूत होता तेथेच राहणार

साताऱ्यातील शांतिदूत होता तेथेच राहणार

Published On: Feb 12 2018 7:10PM | Last Updated: Feb 12 2018 7:10PMसातारा : प्रतिनिधी

सातारा पोलिस मुख्यालयासमोरील शांतिदूत पुतळा हटवल्यानंतर लोकभावना पाहून दै. 'पुढारी'ने तो पुतळा आहे तेथेच ठेवावा अशी भूमिका घेतल्याने अखेर चार दिवसात पोलिसांनी आपला निर्णय मागे घेत शांतिदूत आहे तेथेच ठेवण्याचा निर्णय घेतला. पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी याबाबतचे प्रसिद्धी पत्रक काढले आहे.

१८ वर्षांपूर्वीचा शांतिदूत पुतळा हाटवल्यानंतर सातारकरांमधून तीव्र संताप व्यक्त होत होता. दै. पुढारीने रोखठोक भूमिका घेऊन शांतिदूत शिल्प आहे तेथेच ठेवावे अशीच भूमिका घेतली. गेली चार दिवस साताऱ्यामध्ये यावरून घमासान सुरू असतानाच सोमवारी रात्री पोलिस अधीक्षक पाटील यांनी ते शिल्प आहे तेथेच ठेवत असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, दै. 'पुढारी'ने घेतलेल्या रोखठोक भूमीकेचे सर्वत्र स्वागत होत आहे.