Tue, Nov 13, 2018 10:07होमपेज › Satara › माझ्या एन्काऊंटरसाठी लॉबिंग : सुरेश खोपडे

माझ्या एन्काऊंटरसाठी लॉबिंग : सुरेश खोपडे

Published On: Feb 12 2018 4:55PM | Last Updated: Feb 12 2018 5:40PMसातारा : प्रतिनिधी

मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्याबाबतची कारणमीमांसा मुंबईत कर्तव्य बजावणार्‍या तत्कालीन सर्व पोलिस अधिकार्‍यांनी करावी. तंटामुक्ती योजनेसाठी बक्षीसांची खैरात नकोच, अशा अनेक विषयांवर आपण सेवेत असताना परखड व रोखठोकपणे मते मांडली होती. यामुळेच आयपीएस अधिकार्‍यांची लॉबी माझ्या एन्काऊंटरसाठी टपून बसली असल्याचा गौप्यस्फोट निवृत्त पोलिस अधीक्षक सुरेश खोपडे यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत केला.

सातारा पोलिस मुख्यालयासमोरील शांतीदूताचे शिल्प पोलिसांनी काढल्यानंतर या पुतळ्याचे शिल्पकार निवृत्त पोलिस अधीक्षक सुरेश खोपडे यांनी सोमवारी सातार्‍यात येवून पत्रकार परिषद घेतली. 

ते पुढे म्हणाले, मुंबईवर 26/ 11 रोजी हल्ला होण्यापूर्वी त्यासंबंधी अनेकदा गुप्तचर विभागाकडून इनपूट (हल्ला होण्याच्या शक्यतेची माहिती) आले होते. मात्र  त्याकडे दुर्लक्ष केले गेले.

26/11 हल्ल्याला 10 वर्षे झाल्यानंतर पोलिस अधिकारी कुठे व का कमी पडले? यासाठी संबंधितांनी समाजापुढे येवून खुली चर्चा करावी, असे आवाहन आपण केले होते. याचाच राग मनात धरुन सातार्‍यातील आपण बसवलेले शांतीदूताचे शिल्प काढले असल्याचा आरोप निवृत्त पोलिस अधिकारी सुरेश खोपडे यांनी केल्याने महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ उडाली आहे.