Fri, Jul 19, 2019 22:27होमपेज › Satara › चला ‘पुढारी’ स्नेहमेळाव्याला अनोख्या सोहळ्याला

चला ‘पुढारी’ स्नेहमेळाव्याला अनोख्या सोहळ्याला

Published On: Jan 01 2018 2:09AM | Last Updated: Dec 31 2017 9:51PM

बुकमार्क करा
सातारा/कराड : प्रतिनिधी 

‘नववर्षाचे स्वागत, ‘पुढारी’ सोबत’ हे वर्षानुवर्षाचे समीकरण आता अगदी घट्ट झाले असून, सोमवारी होत असलेल्या ‘पुढारी’ वर्धापनदिन स्नेहमेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या अनोख्या गौरव सोहळ्याचे साक्षी?दार होण्यासाठी अनेक जण आतुरले आहेत. सातारचा सोहळा हॉटेल लेक व्ह्यू लॉन येथे, तर कराडचा हॉटेल थाट बाट सेंटर कोर्ट हॉल येथे होणार आहे. या दोन्ही सोहळ्यांमध्ये ‘पुढारी’वर भरभरून प्रेम करणार्‍या स्नेहीजनांची ताला-सुरांच्या गट्टीत आगळी-वेगळी मैफल रंगणार आहे. 

‘पुढारी’ने सर्व क्षेत्रांवर प्रभाव कायम राखतानाच सातारा जिल्ह्यात आपले अढळस्थान कायम टिकवले असून वर्धापनदिन स्नेहमेळावा म्हणजे वर्षभराच्या वाटचालीतील आनंदाचा परमोच्च क्षण समजला जातो. अनेक आक्रमणे यशस्वीपणे परतवून, भल्याभल्यांशी टक्कर देऊन अजिंक्य पताका फडकावत स्पर्धेच्या युगातही वायूवेगाने घोडदौड करत अनुभवी, प्रतिभाशाली व जनतेच्या प्रश्‍नांविषयी संवेदनशील असलेल्या ‘टीम’च्या जोरावर ‘पुढारी’च्या सातारा आवृत्तीने गेली अनेक     

वर्षे सर्वाधिक खपाचे दैनिक म्हणून आपला नावलौकिक टिकवून ठेवला आहे. त्यामुळेच सामान्य जनतेच्या ह्रदयात ‘पुढारी’चे अढळ स्थान टिकून राहिले आहे. याच भावनेने वर्धापनदिनाच्या आठवडाभर अगोदरच ‘पुढारी’वर शुभेच्छा व आशीर्वादांचा वर्षाव सुरु झाला आहे. आता तर या आनंद सोहळ्याचा निर्णायक क्षण येवून ठेपला आहे. आज  सातारचा स्नेहमेळावा हॉटेल लेक व्ह्यू लॉनवर सायंकाळी 6 ते 9 या वेळेत तर  कराडचा सोहळा बसस्थानकाशेजारी हॉटेल ‘थाट-बाट’ इमारतीमधील सेंटर कोर्ट हॉलमध्ये सायंकाळी 5.30 ते 9 या वेळेत होणार आहे. यावेळी वाचक, विक्रेते, जाहिरातदार आणि हितचिंतकांचा स्नेहमेळाही आयोजित केला आहे.  या दोन्ही सोहळ्यांची  जिल्हावासियांमध्ये उत्कंठा निर्माण झाली आहे. 

‘व्हीजन न्यू इंडिया’ हा प्रमुख विषय घेवून आलेल्या यंदाच्या विशेषांकात विविध क्षेत्रातील बदलांचा आढावा घेण्यात आला आहे. विशेषांकांमध्ये विविध विषयांतील तज्ञ व अभ्यासकांच्या माहितीपूर्ण लेखांसह जिल्ह्याची वैशिष्ठे, समृध्द वारसा, पर्यटनाचा बदलता लूक आदी संग्राह्य व परिपूर्ण माहिती अन् लेखांचा खजाना वाचकांना उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर विविध खात्यांचे मंत्री व नामवंत तज्ञांचे लेख असणार आहेत. राज्यातील उच्च पदस्थ अधिकारी आणि पदाधिकारी यांनीही या विशेषांकासाठी आवर्जून लेखन केले आहे. याशिवाय राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, सहकार, कृषि, अर्थकारण, पर्यावरण अशा विविध विषयांवर असलेल्या अभ्यासपूर्ण लेखांचाही समावेश आहे. या विशेषांकाबाबत कुतूहलाचे वातावरण असून जिल्हावासियांना  या विशेषांकाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. आजपासून हे  विशेषांक प्रकाशित होणार असल्याने वाचक व जाहिरातदारांसाठी वर्धापनदिनाची पर्वणी मिळणार आहे.