Tue, Mar 26, 2019 11:39होमपेज › Satara › नाताळसाठी सातार्‍याची बाजारपेठ सजली

नाताळसाठी सातार्‍याची बाजारपेठ सजली

Published On: Dec 12 2017 2:10AM | Last Updated: Dec 11 2017 10:58PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

अवघ्या 15 दिवसांवर नाताळ सण येऊन ठेपल्याने सातार्‍यातील बच्चे कंपनीला भलतेच आकर्षण निर्माण झाले आहे. नाताळच्या पार्श्‍वभूमीवर बाजारपेठ सजली असून ख्रिसमस ट्री,  वेगवेगळ्या बेल्स, सजावटीचे साहित्य, सांताक्‍लॉजच्या  टोप्या बाजारात दाखल झाल्या आहेत. त्याचप्रमाणे महामार्गाकडेला ठिकठिकाणी नाताळ बाबाच्या टोप्या व खेळणी विक्रीस आल्याचे चित्र दिसत आहे.

सोमवार दि. 25 डिसेंबर रोजी नाताळ सण साजरा होत असतो.  नाताळ सणातील मुख्य आकर्षण म्हणजे ख्रिसमस ट्री आणि सांताक्लॉज. बच्चे कंपनीला तर सांताक्लॉजच्या वेषभूषेचे भलतेच आकर्षण असते. या पार्श्‍वभूमीवर ठिकठिकाणी विक्रीसाठी आलेल्या सांताक्लॉजच्या विविध आकार व प्रकारातील टोप्या लक्षवेधक ठरत आहेत.  नाताळामध्ये कँडल्सचे वेगवेगळे महत्व असते. सणासाठी लागणार्‍या   विविध आकर्षक अशा कँडल्स विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत.

बच्चे कंपनीला भेट घेवून येणार्‍या सांताक्‍लॉजचे विशेष आकर्षण असते. त्यामुळे मुलांना देण्यासाठी पालक मोठ्या प्रमाणावर गिफ्ट खरेदी करत असतात. त्यामध्ये विल चिन्स, काचेचे फ्लॉवर पॉट, विविध प्रकारचे चॉकलेट, फेेंगशुई आयटम, सॅनटायमर यासह विविध वस्तूंची बाजारात चलती आहे. इंग्रजी शाळांना नाताळच्या 10 दिवस  सुट्या दिल्या जात असल्यामुळे सण साजरा करण्याबरोबरच सुट्टीतील कार्यक्रमांचे नियोजन व त्यादृष्टीने  तयारी करण्यातही बच्चे कंपनी  मग्न झाले आहेत.