Fri, Apr 19, 2019 12:09होमपेज › Satara ›  बारा बलुतेदारांचा अभ्‍यास करणार जपानची प्राध्यापिका 

 बारा बलुतेदारांचा अभ्‍यास करणार जपानची प्राध्यापिका 

Published On: Mar 11 2018 3:55PM | Last Updated: Mar 11 2018 4:08PMकुडाळ  : प्रतिनिधी 

जावळी तालुक्यातील बारा बलुतेदार येथील रूढी, परंपरा, तसेच समाज घटनांचा अभ्यास करण्यासाठी जपानवरून ओकिमो टीसीको या प्राध्यापिका आल्‍या आहेत. त्‍यांनी कुडाळ गावातील कुंभरवाड्याला नुकतीच भेट दिली. या भेटीत त्‍यांनी बलुतेदारीच्या संकल्‍पनेविषयी जाणून घेतले.

यावेळी त्यांनी  बाराबलुतेदार त्‍यांचे समाजातील महत्‍व, येथील समाज घडण जाणून घेतली. गावातील बारा बलुतेदार यांच्या हास्‍त कलेतुन घडवलेल्या वस्तूंच्या विनिमयातुन धान्य घेऊन कुटुंबाची उपजीविका आजही ग्रामीण भागात भागवली जाते. त्यामुळेच आजही येथील समाज एकमेकांशी घट्ट आहे. हे जाणून घेउन जपानच्या टोकिमी या प्राध्यपिका भारतात आल्‍या आहेत. त्‍या येथील समाजमनाची भावना, त्‍यांची कार्यपध्दती जाणून घेऊन त्यावर जपानमधील विद्यापिठात पीएचडी करणार  आहेत.