Mon, Mar 25, 2019 14:06होमपेज › Satara › सातारा :  कोयनेत रात्रभरात दोन टीएमसीची भर 

सातारा :  कोयनेत रात्रभरात दोन टीएमसीची भर 

Published On: Jul 15 2018 2:02PM | Last Updated: Jul 15 2018 2:01PMकराड  : प्रतिनिधी 

महाराष्ट्राची वरदायिनी मानल्या जाणाऱ्या पाटण (जि. सातारा) तालुक्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळेच शनिवार सायंकाळी पाच वाजल्यापासून रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना धरणातील पाणीसाठी सुमारे 2 टीएमसीने वाढ झाली आहे. धरणातील पाणीसाठी 64.91 टीएमसीपर्यंत पोहचला असून यापैकी उपयुक्त पाणीसाठी 59.91 टीएमसी इतका आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास अजूनही 40 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे.

कोयना धरण पाटणलोट क्षेत्रात कोयनेसह नवजा, महाबळेश्वर येथे आठवडाभरापासून मुसळधार सुरू आहे. त्यामुळे कोयना धरणात शनिवारी सायंकाळी प्रतिसेंकद 53 हजार 209 क्युसेस पाण्याची आवक होत होती. शनिवारी सायंकाळनंतर रविवार सकाळपर्यंत कोयना येथे 77 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. 

 नवजा येथे 80 आणि महाबळेश्वर येथे 93 मि. मी. पावसाची नोंद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळेच शनिवारी सायंकाळी कोयना धरणात असलेला 63.7 टीएमसी पाणीसाठा रविवारी सकाळपर्यंत 64.91 टीएमसीपर्यंत पोहचला होता. रविवारी सकाळी धरणाची पाणी उंची 2 हजार 124 फूट इतकी तर जल पातळी 647.446 मीटर इतकी होती. गेल्यावर्षी 15 जुलैला धरणातील पाणीसाठी 41. 40 टीएमसी इतका होता. त्यामुळेच धरणात सध्यस्थिती गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी जवळपास 24 टीएमसीहून अधिक पाणीसाठा आहे.