Sun, Jun 16, 2019 12:18
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › टोल दरवाढीबाबत फेरविचार करा 

टोल दरवाढीबाबत फेरविचार करा 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

आनेवाडी व खेडशिवापूर टोलनाक्यावरील नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाने केलेली टोल दरवाढ अन्यायकारक आहे. अपूर्ण कामे पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत कोणत्याही प्रकारे टोलवाढ करू नये. याकरिता ना. नितीन गडकरी यांनी महामार्ग प्राधिकरण, रिलायन्स व संबंधित लोकप्रतिनिधींशी चर्चा करून लादलेल्या वाढीबाबत निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी व्यक्‍त केली आहे.

महा-मार्गावरील खेड शिवापूर आणि आनेवाडी टोलनाक्यांवरील दर 1 एप्रिलपासून वाढले आहेत. यावाढीबाबत खा. उदयनराजे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, यापूर्वी जिल्ह्यातील  तत्कालीन मंत्रीपद भूषवणार्‍या राजकीय नेत्यांनी दबाव टाकून, सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गाची करण्यात येणारी कामे, रिलायन्सच्या   माध्यमातून, क्षमता नसलेल्या दुय्यम ठेकेदारांना स्वार्थासाठी द्यायला भाग पाडले. त्यामुळेच आजअखेरपर्यंत महामार्गावरील कामे नियोजित कालावधीत पूर्ण झाली नाहीत. त्यावेळच्या मंत्री महोदयांच्या निव्वळ राजकीय हट्टापायी उप-कंत्राटदारांची क्षमता, पात्रता व त्याच्याकडे यंत्रसामुग्री आहे का याची कोणतीही खातरजमा  न करता अनुभवी व क्षमता नसलेल्या व्यक्‍तींना उपकंत्राटदार केले गेले. या अकार्यक्षम व्यक्‍तींमुळेच रस्त्याची कामे रखडली गेली.

काही ठिकाणी अत्यंत निकृष्ट दर्जाची कामे करण्यात आल्याने पुन्हा त्यांची दुरुस्ती व डागडुजी करावी लागत आहे. या रस्त्यानंतर कित्येक वर्षाने सुरु करण्यात आलेल्या पुणे-सोलापूर या रस्त्याचे काम जलदगतीने झाले आहे. तथापि राष्ट्रीय महामार्गावर टोल वसुली सुरू असूनही विविध कामे मुदतीत पूर्ण झालेली नाहीत. त्यातच पुन्हा टोलची दरवाढ वाहनधारकांवर लादली जाते हा तर मोठाच विरोधाभास असल्याचे उदयनराजेंनी म्हटले आहे.

त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाव्दारे नुकत्याच प्रसिध्द केलेल्या अधिसुचनेव्दारे लादलेल्या, टोल दरवाढीबाबत ना. नितीन गडकरी यांनी स्वतः संबंधीतांशी चर्चा करुन, वाहनधारकांना दिलासा देण्याचा निर्णय तातडीने घ्यावा, असेही त्यांनी पत्रकात नमूद केले आहे.
 

 

 

tags ; Satara,news,khed, shivapur,agavadi, toll,growth, rethink,


  •