Tue, Jul 16, 2019 09:37होमपेज › Satara › दै. पुढारी कस्तुरी क्‍लबतर्फे पर्यटनासह देवदर्शनाची संधी

दै. पुढारी कस्तुरी क्‍लबतर्फे पर्यटनासह देवदर्शनाची संधी

Published On: Feb 06 2018 1:51AM | Last Updated: Feb 05 2018 9:38PMसातारा : प्रतिनिधी

देवदर्शनाबरोबरच पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी दै. ‘पुढारी’  कस्तुरी क्लबच्यावतीने  महिला व युवतींसाठी फेब्रुवारीमध्ये सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळच्या नाष्ट्यापासून रात्रीचे जेवण व मुक्कामाची सोय कस्तुरी क्लबतर्फे करण्यात येणार असून दोन दिवस व एक रात्र असे सहलीचे नियोजन आहे. थंड हवा, फे्रेश मूड यामुळे जानेवारी व फेब्रुवारी महिन्यांमध्ये  जास्तीतजास्त  सहलींचे आयोजन केले जाते. याचमुळे  दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबतर्फे या सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. गुलाबी थंडी, देवदर्शनासह पर्यटनाचा  लाभ असा दुहेरी योग दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबच्या सहलीमधून महिलांना मिळणार आहे.  दोन दिवस व एक रात्र असे सहलीचे नियोजन असून  रात्रीचा मुक्काम व सर्व ठिकाणच्या  प्रवेश शुल्काची फी सहल खर्चामध्ये समाविष्ट असणार आहे. 

 दै. ‘पुढारी’  कस्तुरी क्लबच्या देवदर्शन आणि पर्यटन सहलीसाठी कस्तुरी क्लबच्या सभासदांसाठी 1750  व बिगर सभासदांसाठी 2000 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. आसन क्षमता मर्यादित असल्याने  आणि प्रथम येणार्‍यास प्रथम संधी असल्याने कस्तुरी क्लबच्या सदस्यांनी त्वरित आपली जागा बुक करावी, असे आवाहन दै. ‘पुढारी’च्या कस्तुरी क्लबच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी दै. पुढारी कार्यालय तेजस्विनी बोराटे 8805007192 येथे संपर्क साधावा.