Thu, Feb 21, 2019 13:08होमपेज › Satara › जावली :  २३ किलो चंदन जप्त

जावली :  २३ किलो चंदन जप्त

Published On: Jun 20 2018 5:14PM | Last Updated: Jun 20 2018 5:14PMसावली : वार्ताहर 

गवडी ता. जावली येथे चंदनाची बेकायदेशीर वाहतूक करताना वन विभागाने पिक अप गाडी पकडली. या कारवाईत 60 हजार रुपये किमतीचे 23 किलो चंदन जप्त करण्यात आले आहे.

 याबाबत मिळालेली माहिती अशी, मेढा वनपरिक्षेत्राचे अधिकारी व कर्मचारी गस्तीवर असताना गवडी गावच्या हद्दीत चंदनाची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गवडी ता.जावली येथे बोलेरो पीकअप गाडी क्र MH ११ AG ३o८७ ही गाडी संशयास्पद रित्या आढळल्याने गाडीची तपासणी केली असता, गाडीत 60 हजार रुपये किमतीचे 23 किलो चंदन आढळले.  या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आसून, २३ किलो चंदन जप्त करण्यात आले आहे.