Fri, May 24, 2019 08:31होमपेज › Satara › मानव-वन्यजीव संघर्षावर दक्षता पथकाचा तोडगा

मानव-वन्यजीव संघर्षावर दक्षता पथकाचा तोडगा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सातारा : दीपक देशमुख

वन्य पशूंची कमी झालेली संख्या चिंतेचा विषय बनत असतानाच गेल्या काही वर्षांपासून सातारा जिल्ह्यातील पश्‍चिमेकडील भागात बिबट्यांचे होत असलेले दर्शन आशादायक चित्र आहे. तथापि, आता बिबट्या मानवी वस्त्यांतही वावरू लागल्याने मानव-वन्यजीव संघर्ष उभा राहू शकतो. त्यातून पुन्हा वन्य जीवांचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्‍वभूमीवर मानव वन्यजीव संघर्ष दक्षता पथकाची स्थापना हे महत्त्वाचे पाऊल ठरेल. 

सातारा शहर व परिसरात गेल्या काही दिवसापासून बिबट्याचा नागरी वस्तीत वावर वाढला असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या पार्श्‍वभुमीवर  वनविभागाने शाहूपुरी, शाहूनगर व माचीपेठेतील नागरिकांचे मिळून मानव वन्यजीव संघर्ष दक्षता पथकाची स्थापना केली आहे. काही दिवसापूर्वी शाहूपुरी परिसरात बिबट्याने नागरी वस्तीत धाव घेवून दोघाजणांवर हल्ला केला होता त्यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे शाहुपूरी परिसरातील नागरिकांनी वनविभागाकडे मानव वन्यजीवन संघर्ष दक्षता पथक स्थापन करण्याची मागणी केली होती. त्याला वनविभागाने प्रतिसाद दिला. त्यानंतर शाहूपुरी येथे उपवनसंरक्षक अनिल अंजनकर व वनक्षेत्रपाल महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांची बैठक घेऊन त्यांना सूचना दिल्या.

माचीपेठ, शाहूनगर परिसरातही बिबट्याचा वावर वाढला असल्याने शाहूपुरी, शाहूनगर व माचीपेठेतील नागरिकांचे मिळून मानव वन्यजीव संघर्ष दक्षता पथकाची स्थापना केली आहे. या तिन्ही ठिकाणच्या सुमारे 35 नागरिकांचा मानव वन्यजीवन संघर्ष दक्षता पथकात समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार नुकतीच या पथकातील नागरिकांची वन विभागामार्फत कार्यशाळा घेवून त्यांना सूचना देण्यात आल्या असल्याचे महेश पाटील यांनी सांगितले. वनविभागामार्फत शाहूपुरी, शाहूनगर व माचीपेठेत गस्त घालण्यात येत असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
 


  •