होमपेज › Satara › सातारा : मुसळधार पावसाने महाबळेश्वर - पाचगणी रस्ता जलमय  ( video)

सातारा : मुसळधार पावसाने महाबळेश्वर - पाचगणी रस्ता जलमय  ( video)

Published On: Jul 16 2018 1:34PM | Last Updated: Jul 16 2018 1:34PMमहाबळेश्वर : वार्ताहर

गेल्या काही दिवसांपासून महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. तरीसुद्धा पावसाळी पर्यटनासाठी पर्यटक गर्दी करत आहे. सोमवारी पावसाचा जोर वाढल्यामुळे महाबळेश्वर - पाचगणी हा रस्ता पाण्याखाली गेला होता. यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

याचबरोबर महाबळेश्वर आणि पाचगणी शहराला पाणीपुरवठा करणारा वेण्णा लेक पूर्ण भरला आहे. शहरावर धुक्याची चादर पसरली असून प्रमुख रस्ते पाण्याखाली गेल्याचे चित्र आहे. 

महाबळेश्वर - पाचगणी हा मुख्य रस्ता असून सोमवारी सकाळी हा रस्ता पूर्णपणे जलमय झाला होता. त्यामुळे वाहनांना पुढे जाता येत नव्हते. त्यानंतर सहयाद्री ट्रेकर्सनी ही वाहतूक सुरळीत केली.