Wed, Jul 17, 2019 20:38होमपेज › Satara › सातार्‍यात हॉकर्सचे पुनर्वसन कधी होणार

सातार्‍यात हॉकर्सचे पुनर्वसन कधी होणार

Published On: Feb 14 2018 2:56AM | Last Updated: Feb 13 2018 10:04PMसातारा : प्रतिनिधी

मोळाचा ओढा ते गोडोली रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी गेल्या महिन्यात बसस्थानक ते पोवई नाका परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली होती. येथे व्यवसाय करणार्‍या 130 हॉकर्सची सोय पालिकेने तहसील कार्यालयामागे केली आहे. मात्र, तेथे अद्यापही सोयी सुविधा न पुरवल्याने हॉकर्सचे पुनर्वसन कधी होणार? याचे उत्तर तीन वर्षानंतरही मिळालेले नाही.

येथे व्यवसाय करणार्‍या 175 व्यवसायिकांना नोटीसा देऊन खोकी, टपर्‍या हटविण्याच्या सूचना पालिकेने केल्या होत्या. या ठिकाणचे अतिक्रमण काढण्यापूर्वी येथील व्यवसायिकांची सोय करण्यात यावी, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली होती. त्यानुसार 10 वर्षांहून अधिक काळ व्यवसाय करणार्‍या व्यसायिकांचा सर्व्हे करून तहसील कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस त्यांच्यासाठी सोय करण्यात येईल असे आश्‍वासन दिले होते.  या ठिकाणी तीन वर्षाच्या कालावधीत दोन ते तीन वेळा अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली आहे. तरीही या ठिकाणी फळ आणि कपडे विक्रेते अजूनही ठाण मांडून बसले आहेत. तहसील  कार्यालयाच्या पाठीमागे पालिकेने हॉकर्सच्या पुनर्वसाची जागा पाहिली होती. या

ठिकाणी जमेल तेवढ्या  व्यवसायिकांचे पुनर्वसन 

होईल, असे सांगण्यात आले होते. त्या दृष्टीने प्राथमिक दृष्ट्या कामही झाले होते. येथील जागा सपाट करून खडी टाकण्यात आली. त्यानंतर अद्याप काहीच काम करण्यात आलेले नाही. बसस्थानक ते मोळाचा ओढा मार्गावर असणारे सर्व व्यवसायिक या ठिकाणी बसणार नाहीत  याची माहिती असल्याने पालिकेने इतरत्र ठिकाणी त्यांची सोय करण्याच्या दृष्टीने विचार विनिमय केला होता. मात्र, ही चर्चा अद्यापही गुलदस्त्यात आहे.