Mon, Jun 01, 2020 01:42होमपेज › Satara › ग्रा.पं. निवडणुकांचा ऑनलाईन ने फज्जा

ग्रा.पं. निवडणुकांचा ऑनलाईन ने फज्जा

Published On: Feb 13 2018 2:00AM | Last Updated: Feb 12 2018 11:01PMसातारा : प्रतिनिधी

जिल्ह्यात सार्वत्रिक निवडणूक लागलेल्या 77 ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी  190  तर  सदस्य पदासाठी 857  अशा 1 हजार 47 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पोटनिवडणूक लागलेल्या 424 ग्रामपंचायतींच्या रिक्‍त जागांमध्ये सरपंचपदासाठी 2 तर सदस्यपदासाठी 181 उमेदवारी अर्ज आले. दरम्यान, संपूर्ण निवडणूक प्रक्रियेतील ऑनलाईन घनशाघोळाने पोटनिवडणूक लागलेल्या तब्बल 12 ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले नाहीत. संबंधित ग्रामपंचायतींचा पुन्हा निवडणूक कार्यक्रम राबण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात तीन महिन्यांपूर्वी 118 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने पुन्हा 77 ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक तर 424 ग्रामपंचायतींच्या रिक्‍त जागांसाठी पोट निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. मात्र, सततच्या सर्व्हर डाऊनमुळे ही निवडणूक इच्छुक उमेदवारांसाठी डोकेदुखीची ठरली. विशेषत: पोट निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायतींना ऑनलाईन घनशाघोळाचा सामना करावा लागला. त्यामध्ये सातारा तालुक्यातील मगदुलभटाचीवाडी (शिवाजीनगर), सोनवडी, आंबळे रायघर, कराड तालुक्यातील चोरजवाडी, धावरवाडी, शेवाळेवाडी (उंडाळे); पाटण तालुक्यातील मानेगाव, सांगवड; फलटण तालुक्यातील उळुंब, मिर्‍याचीवाडी; खटाव तालुक्यातील मानेवाडी, तुपेवाडी; कोरेगाव तालुक्यातील गोळेवाडी या ग्रामपंचायतींच्या रिक्‍त जागांसाठी पुन्हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. त्याबाबत चर्चा होती. मात्र, उशिरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाला आयोगाच्या कोणत्याही सूचना आल्या नव्हत्या. संबंधित 12 ग्रामपंचायतींमध्ये 10 सदस्यपदांसाठी तर 2 सरपंचपदासाठींच्या जागा आहेत.
 

सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सातारा तालुक्यातील 4 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी 10 तर सदस्यपदासाठी 51 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. पोट निवडणूक लागलेल्या 66 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी 1 तर सदस्यपदासाठी 66 जणांनी अर्ज दाखल केले.  कोरेगाव तालुक्यातील 3 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंचपदासाठी 9 तर सदस्यपदासाठी 43 जणांनी अर्ज दाखल केले. पोटनिवडणुकीत सदस्यपदासाठी 10, सरपंचपदासाठी एक अर्ज दाखल झाला. सार्वत्रिक निवडणूक लागलेल्या कराड तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी 41 तर सदस्यपदासाठी 182 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. पोटनिवडणूक लागलेल्या 49 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदासाठी 28 जणांनी अर्ज दाखल केले. सार्वत्रिक निवडणूक  लागलेल्या वाई तालुक्यातील 7 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी 19 तर सदस्यपदासाठी 87 जणांनी, पोट निवडणुकीसाठी 34 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदासाठी 12 जणांनी फलटण तालुक्यातील पोट निवडणूक लागलेल्या 18 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदासाठी 8 जणांनी अर्ज दाखल केले.

खटाव तालुक्यात सार्वत्रिक निवडणूक लागलेल्या 5 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी 16 तर सदस्यपदासाठी 87 जणांनी, पोट निवडणुकीसाठी 25 ग्रामपंचायतींच्या  सदस्यपदासाठी 21 जणांनी, माण तालुक्यात सार्वत्रिक निवडणूक लागलेल्या  एका ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी 1 तर सदस्यपदासाठी 9 जणांनी, पोट निवडणुकीसाठी  6 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदासाठी 15 जणांनी, जावली तालुक्यातील सार्वत्रिक निवडणूक लागलेल्या  18 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी 36 तर सदस्यपदासाठी 135 जणांनी, पोट निवडणुकीसाठी 56 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदासाठी  फक्‍त 5 जणांनी अर्ज दाखल केले. पाटण तालुक्यात सार्वत्रिक निवडणूक लागलेल्या  11 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी 39 तर सदस्यपदासाठी 177 जणांनी, पोट निवडणुकीसाठी 80 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदासाठी 27 जणांनी, महाबळेश्‍वर तालुक्यात सार्वत्रिक निवडणूक लागलेल्या  15 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी 19 तर सदस्यपदासाठी 86 जणांनी, पोट निवडणुकीसाठी 43 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदासाठी  फक्‍त एकाने  तर खंडाळा तालुक्यातीत 15 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीत 9 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल  केले.