Mon, Jun 17, 2019 04:14होमपेज › Satara › सिव्हिलमध्ये संशयितांची सरबराई

सिव्हिलमध्ये संशयितांची सरबराई

Published On: Dec 20 2017 1:44AM | Last Updated: Dec 20 2017 12:00AM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

सातारामधील सुरुचि राडाप्रकरणात अटकेत व न्यायालयीन कोठडीत असणार्‍या संशयितांचे मोबाईल टॉवर लोकेशन घटना घडलेल्या तीन विविध ठिकाणी आढळले आहेत. संशयितांची जिल्हा शासकीय रुग्णालयात सरबराई होत असून, त्याची काही महत्त्वाची कागदपत्रेही सरकार पक्षाने जिल्हा न्यायालयात दाखल करून संशयितांचा जामीन फेटाळावा, अशी मागणी सरकार पक्षाच्या वतीने करण्यात आली. दरम्यान, बुधवारी पुढील सुनावणी होणार आहे.

सुरुचि राडाप्रकरणात खासदार व आमदार गटातील समर्थक जामिनासाठी जिल्हा न्यायालयात गेले आहेत. सोमवारी बचाव पक्षाने युक्तिवाद केल्यानंतर मंगळवारी सरकार पक्षाने त्यावर युक्तिवाद केला. बचाव पक्षाने विविध विषयांवर युक्तिवाद केला. यामध्ये जे अटकेतील व न्यायालयीन कोठडीत संशयित आहेत, त्यांनी तपासात पोलिसांना सहकार्य केलेले नाही. न्यायालयीन कोठडीतील संशयित गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्यावर सुरू असलेला उपचार संशोधनाचा विषय असून, त्याबाबतचे काही महत्त्वाची  कागदपत्रेच सरकारी पक्षाने न्यायालयात दाखल केली.

घटनेच्या दिवशी आनेवाडी टोल नाका, सर्कीट हाऊस, सुरुचि बंगला परिसर येथे संशयितांचे मोबाईल टॉवर लोकेशन मिळालेले आहे. दरम्यान, पुणे येथील संशयितांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. घटनेदिवशी असे गुंडही सातार्‍यात असल्याने त्यांना सुपारी देवून कोणी आणले? याचा तपास पोलिसांना करायचा आहे. याशिवाय फायरींगच्या पुंगळ्या सापडल्याने ते फायरींग कोणी केले, हा महत्वाचा  तपास बाकी असल्याचे सरकार पक्षाने सांगून संशयितांना जामीन देवू नये, असा युक्तिवाद न्यायालयात केला.