Wed, Nov 14, 2018 12:53होमपेज › Satara › प्रतापगडावरील झेडपी सभांवर आचारसंहितेचे सावट 

प्रतापगडावरील झेडपी सभांवर आचारसंहितेचे सावट 

Published On: Feb 10 2018 1:38AM | Last Updated: Feb 09 2018 11:06PMसातारा : प्रतिनिधी

शिवजयंतीनिमित्त दि. 19 फेब्रवारी रोजी किल्ले प्रतापगड ता. महाबळेश्‍वर येथे सातारा जिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्या होणार्‍या विषय समितींच्या सभांवर ग्रामपंचायत निवडणुकांंच्या आचारसंहितेचे सावट आले आहे.  जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या ठरावानुसार व विभागीय आयुक्तांच्या मान्यतेने दरवर्षी शिवजयंतीदिवशी दि. 19 फ्रेबुवारी रोजी किल्ले प्रतापगडावर जिल्हा परिषदेच्या शिक्षण व अर्थ, महिला व  बालकल्याण, समाजकल्याण, कृषी व पशुसंवर्धन, स्थायी व जलसंधारण,आरोग्य व बांधकाम या विषय समितींच्या सभा होत असतात.

शिवजयंतीदिवशीच विषय समितीच्या सभा होत असल्याने अनेक सदस्यही मोठ्या संख्येने या सभांना उपस्थित असतात. यावर्षी महाबळेश्‍वर तालुक्यातील ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. तालुक्यातील सुमारे 60 टक्क्याहून अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणूका होणार आहेत. त्यामुळे विषय समितीच्या सभांवर आचारसंहितेचे सावट आहे. या सभांमध्ये कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही.दरम्यान प्रशासनाने प्रतापगडावर नेहमीप्रमाणे घेण्यात येणार्‍या विषय समित्यांच्या सभाच न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

सभेऐवजी किल्ले प्रतापगडावर शिवजयंतीचा कार्यक्रम भव्य दिव्य स्वरुपात साजरा करण्यात येणार आहे. सकाळी भवानीमातेस जलाभिषेक व पूजा, मंदिर परिसरात ध्वजारोहण, भवानी मंदिर ते शिवाजी महाराज पुतळ्यादरम्यान पालखी मिरवणुक व अभिवादन, पोवाडा, सांस्कृतिक कार्यक्रम, शिवचरित्रावर व्याख्यान आदी कार्यक्रम होणार आहेत.