Mon, Jan 21, 2019 21:19होमपेज › Satara › सातार्‍यात काविळीची साथ फैलावली

सातार्‍यात काविळीची साथ फैलावली

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत सातारा शहर व परिसरातील उपनगरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याने ऐन उन्हाळ्यात साथीच्या रोगाने थैमान घातले आहे. शाहूपुरी, विसावा नाका, सदरबझार परिसरात काविळीची साथ फैलावली असून शहरात अन्यत्रही विस्कळीत स्वरूपात काविळीचे रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली  आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत दररोज सातारा शहर व परिसरातील उपनगरात पाणीपुरवठा   करण्यात येतो. मात्र या जलवाहिनी जुन्या असल्याने अनेक ठिकाणी या जलवाहिनीला गळती लागली आहे. त्यामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. तसेच गळती लागलेल्या जलवाहिन्यांमध्ये गटाराचे सांडपाणी जात आहे.

त्यामुळे नागरिकांना दुषित पाणीपुरवठा होत असून गेल्या काही दिवसांपासून शहरात ठिकठिकाणी काविळीची साथ फैलावली आहे.  शाहूपूरी परिसरात काविळीच्या साथीने नागरिक आजारी असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून होत असलेल्या दुषित पाण्यामुळेच नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जिल्हा परिषद कॉलनी, धर्मवीर संभाजीनगर व अन्य परिसरात काविळीची साथ झाली आहे. याशिवाय सदरबझार व यशवंत कॉलनी, विसावा नाका येथेही काविळीचे रूग्ण आढळून आले आहेत. प्राधिकरणाच्यावतीने केला जाणारा पाणीपुरवठा दूषित असून अनेक ठिकाणी पाण्यात आळ्या सापडल्या असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 
 


  •