Wed, Nov 21, 2018 19:40होमपेज › Satara › सातारा दारूविक्रीचे सहा अड्डे उद्ध्वस्त

सातारा दारूविक्रीचे सहा अड्डे उद्ध्वस्त

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

सातारा शहर परिसरासह तालुक्यात बेकायदा दारूविक्री करणारे अड्डे पोलिसांनी उद्ध्वस्त करत 10 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत तब्बल 53 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्‍त केला. छाप्यामध्ये पोलिसांनी सुमारे 230 दारूच्या बाटल्या जप्‍त केल्या आहेत. दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईमुळे मटका, जुगार बहाद्दरांप्रमाणे बेकायदा दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. अक्षय बबन किर्तीकुडाव, प्रशांत सर्जेराव किर्तीकुडाव (दोघे रा. कोडोली), नवनाथ मिरगे (रा.कोडोली), जयसिंग कांबळे (रा.प्रतापसिंहनगर), चंदन माणिकराव वाघ (रा.चाहूर), चेतन प्रदीप सोळंखी (रा.सदरबझार), नारायण दत्तात्रय पवार (रा.धावडशी), मुनिफ राजकिशोर शर्मा, अल्ताफ 

जमाल पठाण, अस्लम जमाल पठाण (तिघे रा.जवळवाडी ता. सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, सातारा शहर परिसरातील कोडोली, दत्तनगर, रहिमतपूर रोड, धावडशी, जवळवाडी येथे बेकायदा दारुविक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. शनिवारी दिवसभारात व रात्री पोलिसांनी याठिकाणी विविध  पथकाद्वारे छापासत्र राबवले. पोलिसांनी छापा टाकला असता घटनास्थळावरुन पोलिसांना 230 दारुच्या बाटल्या, रोख रक्‍कम व दुचाकी असा मुद्देमाल जप्‍त केला आहे.

दरम्यान, पोलिसांनी हे छापासत्र राबवल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. हे सर्व अड्डे घराशेजारी आडोशाला, गावच्या कमानी परिसरात, आडबाजूला सुरु होते. पोलिसांनी छापा टाकल्याचे लक्षात येताच अनेकांनी पळून जाण्याचा प्रयत्नही केल्याने गोंधळ उडाला होता. तसेच सध्या अनेक ठिकाणी यात्रा सुरु आहेत. या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी कारवाई केल्याने दारु विक्रेत्या व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. सातारा शहर व तालुका पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हे दाखल झालेले आहेत. अवैध दारु विक्री होत असल्याबाबत पोलिसांना माहिती द्यावे, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.
 

 

 

 

tags : Satara,news,city ,campus, illegal,liquor, market, broke, down,


  •