Fri, Apr 26, 2019 03:21होमपेज › Satara › जि. प. सदस्य उमेदवाराचा संभाजीनगरात पराभव

जि. प. सदस्य उमेदवाराचा संभाजीनगरात पराभव

Published On: Mar 03 2018 1:43AM | Last Updated: Mar 02 2018 11:16PMकोडोली : वार्ताहर

सातारा शहरातील संभाजीनगर ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत प्रतिष्ठेची निवडणूक करणार्‍या विद्यमान जि. प. सदस्याच्या उमेदवाराचा दारुण पराभव झाल्याने संभाजीनगरमध्ये एकच जल्‍लोष करण्यात आला. या निवडणुकीत अलका कुंजीर यांनी सुजाता  अनिल घोलप यांचा 210 मतांनी पराभव केला.  या निमित्‍ताने येथील मतदारांनी पुढच्या निवडणुकीची तयारी दाखविल्याचे चित्र स्पष्ट झाले. 

विद्यमान जि.प.सदस्या सौ.अर्चना देशमुख यांची कोडोली गटातून जि.प.सदस्य म्हणून निवड झाल्याने संभाजीनगरच्या वार्ड क्रमांक तीनची पोटनिवडणूक लागली होती. या वॉर्डाची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी लोकप्रतिनिधींसह अनेकांनी प्रयत्न केले.  जि.प. सदस्या सौ.अर्चना देशमुख, माजी  जि.प.उपाध्यक्ष रवी साळुंखे व विद्यमान उपसरपंच सुभाष मगर यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली. त्यांनी सौ.सुजाता अनिल घोलप यांची उमेदवारी जाहीर केली.

त्याविरोधात संभाजीनगर ग्रामविकास पॅनल व संस्थापक पॅनेल एकत्र येवून माजी उपसरपंच सतीश माने, संस्थापक पॅनलचे प्रमुख माजी पं.स.सदस्य आनंदराव कणसे, संभाजीनगर ग्रामविकास पॅनलचे दादा तांगडे, जयवंतराव मोरे, मोहनराव पोळ यांनी एकविचाराने खा.उदयनराजे,  आ. शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सौ. अलका विजय कुंजीर यांची उमेदवारी जाहीर केली. या निवडणुकीत अलका कुंजीर यांनी सुजाता अनिल घोलप यांचा 210 मतांनी पराभव केला. या निवडणुकीसाठी काँग्रेसचे माजी जि.प. सदस्य अ‍ॅड.विजयराव कणसे, जि.प.चे माजी अर्थ समितीचे सभापती सुनिल काटकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस  गोरख नलवडे, पालिकेचे उपाध्यक्ष सुहास राजेशिर्के, नगरसेवक डी.जी.बनकर, ग्रामस्थांचे मोठे सहकार्य लाभले.