Wed, Mar 27, 2019 05:57होमपेज › Satara › सातार्‍यात केक व चॉकलेट मेकिंग वर्कशॉप

सातार्‍यात केक व चॉकलेट मेकिंग वर्कशॉप

Published On: Dec 20 2017 1:45AM | Last Updated: Dec 19 2017 11:03PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

दै. ‘पुढारी’ कस्तुरी  क्लबच्यावतीने  नाताळच्या पार्श्‍वभूमीवर महिलांसाठी  रविवार दि. 24 डिसेंबर रोजी  दुपारी 1 ते 5 या वेळेत शाहूपुरी येथे मायक्रोव्हेवशिवाय गॅसवर बनवता येणार्‍या ‘केक व चॉकलेट मेकिंग’चे वर्कशॉप आयोजित करण्यात आले आहे.

दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबच्या माध्यमातून महिलांसाठी सातत्याने अनेक उपक्रम राबवले जात  असून   यामध्ये विविध प्रकारचे वर्कशॉप  आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा समावेश असतो.  काही दिवसांवर नाताळ सण आला असून नाताळातील बच्चे कंपनीचे खास आकर्षण असलेले केक, चॉकलेट्स मायक्रोव्हेवशिवाय गॅसवर महिलांना घरच्याघरी बनवता यावेत यासाठी  ‘दै. पुढारी’ कस्तुरी क्लबच्या माध्यमातून ‘केक व चॉकलेट मेकिंग’चे वर्कशॉप आयोजित केले आहे.

‘केक व चॉकलेट मेकिंग’ वर्कशॉप रविवार दि. 24 रोजी  दुपारी 1 ते 5 या वेळेत  मेसमान मार्केट, शाहूपुरी पोलिस स्टेशनजवळ शाहूपुरी, सातारा येथे होणार आहे. त्यामध्ये  यम्मी केक अ‍ॅण्ड कुकिंग क्लासेसच्या शबाना मेसमान    महिलांना केक व चॉकलेट बनवण्याचे प्रशिक्षण देणार आहेत. केकमध्ये ब्लॅक फॉरेस्ट, पाईनअ‍ॅपल, स्ट्रॉबेरी फॉरेस्ट आदि प्रकार, चॉकलेट्समध्ये चॉकलेट लॉलिपॉप, विविध आकारातील रोस्टेड आलमंड कॅडबरी, ख्रिसमस स्पेशल चॉकलेट्स घरच्याघरी बनवण्यास शिकवणार आहेत.

घरच्याघरी सहज व सुलभतेने केक व चॉकलेट्स प्रशिक्षण संधीचा महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबच्यावतीने करण्यात आले आहे. या वर्कशॉपसाठी नावनोंदणी आवश्यक असून अधिक  माहितीसाठी दै. पुढारी कार्यालय, सातारा येथे तेजस्विनी बोराटे (8805007192) यांच्याशी संपर्क साधावा. 

कस्तुरी सभासदांसाठी फक्त 50 रुपये शुल्क केक व चॉकलेट मेकिंग वर्कशॉपसाठी कस्तुरी क्लबच्या सभासदांना फक्त 50 रुपये व सभासद नसलेल्यांना 200 रुपये प्रशिक्षण शुल्क असणार आहे.  प्रशिक्षणासाठी कस्तुरी क्लबच्या सभासदांनी ओळखपत्र आणणे आवश्यक आहे.कार्यक्रमस्थळी कस्तुरी क्लबची नावनोंदणीची व्यवस्था करण्यात आली असून  सभासद झाल्यावर लगेच नॉनस्टीकची कढाई व 25 सवलतींची कूपन्स दिली जाणार आहेत.