Sun, May 26, 2019 18:40होमपेज › Satara › सातारा : उद्यापासून पुण्यात बैलगाडी शर्यत संघटनेचे बेमुदत आंदोलन

सातारा : उद्यापासून पुण्यात बैलगाडी शर्यत संघटनेचे बेमुदत आंदोलन

Published On: Mar 12 2018 2:12PM | Last Updated: Mar 12 2018 2:12PMकराड : प्रतिनिधी

अखिल भारतीय बैलगाडी शर्यत संघटनेकडून 'पेटा' या संस्थेच्या निषेधार्थ मंगळवार, १३ मार्चपासून पुणे येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनास प्रारंभ केला जाणार असल्याची माहिती संघटनेचे पदाधिकारी नितीन शेवाळे, पैलवान धनाजी शिंदे, पैलवान आनंदराव मोहिते यांनी दिली आहे.

बैलगाडी शर्यतीवर बंदी घालत शेतकऱ्यांवर अन्याय करण्यात आला आहे.  त्यामुळे केंद्र सरकार तसेच राज्य शासनाने बैलगाडी शर्यत पुन्हा सुरू करण्यासंदर्भात ठोस निर्णय घेत सर्व अडथळे दूर करावेत, अशी मागणीही या आंदोलनाद्वारे केली जाणार आहे. याशिवाय बैलगाडी शर्यतीला विरोध करणाऱ्या 'पेटा'च्या निषेधार्थ हे आंदोलन केले जात असून यात बैलगाड्यांच्या शेतकरी, तसेच बैलगाडी शर्यत संघटनेचे पदाधिकारी व राज्यभरातील सदस्य बैलगाड्यांसह सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.