होमपेज › Satara › ऑर्ग्युमेंट नको, तिचं मतही घ्या ध्यानात

ऑर्ग्युमेंट नको, तिचं मतही घ्या ध्यानात

Published On: Feb 14 2018 2:42AM | Last Updated: Feb 14 2018 2:42AMसातारा : दीपक देशमुख

आज व्हॅलेंटाईन डे... अनेक प्रेमवीर याच दिवसाची तर प्रतीक्षा करत असतात. तथापि, अनेकांना असा अनुभव येतो की तिच्यासमोर मन मोकळं केले अन् तिनं मात्र मनाची दारं धाडकन बंद करून नो, सॉरी अशा शब्दांच्या फटकार्‍यात मॅटर क्‍लोज मॅटरच क्‍लोज केला. अशावेळी तोंड पाडून तिथेच ऑर्ग्युमेंट करत थांबणे किंवा रागाने नाकारल्याचा जाब विचारणे, पुन्हा-पुन्हा जावून विचारणा करणे असे पर्याय काहीजण स्वीकारतात. तिथेच लोचा होतो व प्रकरण भांडणापर्यंत येऊ शकते. या ऐवजी ‘तिच्या’ निर्णयाचा योग्य तो आदर राखत वस्तुस्थिती स्विकारल्यास पुढील कटू प्रसंग टाळता  येतील. 

व्हॅलेंटाईन वीक सुरू झाल्यापासून  ‘रोज डे’ने  सुरुवात झाली असून प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे, किस डे आणि आता व्हॅलेंटाईन डे असा दररोजच धमाका सुरू आहे. व्हॅलेंटाईनमध्ये प्रपोज डे दिवसाची  प्रत्येक प्रेमवीराला असतेच. याच दिवशी तिच्यासमोर मन मोकळं करायचं असतं. प्रपोज करायचं असतं.  अभी नही तो कभी नही म्हणत अनेकांनी केलंही असेल. तथापि, यावेळी नकार पचवावा लागेल कोणी विचार करत नाही. प्रत्येकजण पॉझिटिव्हलीच घेत असतो. त्यामुळे तिनं नकार दिल्यानंतर मात्र, त्यावेळी नेमकं काय करायचं याचा कोणताही विचार झालेला नसतो. 

तिच्या तोंडून आलेला ‘नो’ हा एक शब्द जणू सगळ्या स्वप्नांना डिलिट करून टाकतो. अशावेळी अनेकदा मनावर ताबा न राहिल्याने नाकारण्याचा जाब विचारला जातो, किंवा तिथे ऑर्ग्युमेंट केले जाते. त्यामुळे वादावादी होवून प्रकरण भांडणावर येण्याची शक्यता असते. यामुळे तिच्याशी असलेली मैत्रीही गमावण्याची शक्यता असतो.  सध्या सोशल मिडियावरही व्हॅलेंटाईन विकच्या शुभेच्छांची देवाण-घेवाण सुरू आहे. मात्र, नकार मिळाल्यानंतर सोशल मिडियावरही आपले दु:ख व्यक्त करणार्‍या पोस्ट टाकत असतात. यामुळे आपल्या खाजगी गोष्टींची जाहीर चर्चा होऊ शकते, या गॉसिपिंगचा तिला त्रास झाल्यास तुमच्याबद्दल आणखी नकारात्मक मत बनू शकते.  

प्रेमवीरांनी तिचा नकार सकारात्मक घेणेच उत्तम.  व्हॅलेंटाईन संस्कृती ही पाश्‍चात्यांचीच. अलिकडे भारतात मात्र, युवकांमध्ये या मोठीच क्रेझ आहे. अनेकजण या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र, होकार-नकार या जर तरच्या गोष्टी आहेत. होकार मिळाल्यास प्रेम बहरू लागते. तथापि, नकार मिळाल्यानंतर लगेच घाईघाईने कुठलाही निर्णय न घेता किंवा तिला पुन्हा-पुन्हा विचारण्यापेक्षा तिला याबाबत थोडा वेळ देणे गरजेचे आहे. 

मग जरा जपूनच..

पुर्वी मुले-मुली फारशा एकमेकांशी बोलत नसत. सध्या मात्र, मुलीही मनमोकळेपणाने बोलत असतात. याचा अर्थ तिचं आपल्यावर पे्रम असल्याचे मत अनेकदा युवकांचे होवू शकते. मात्र, नकार देवूनही सातत्याने विचारणा होवू लागल्यास मुलींनी अशा प्रेमवीरापासून अंतर ठेवणे योग्य ठरेल.