Thu, Apr 25, 2019 13:28होमपेज › Satara ›  तहसील कार्यालयावर मोर्चा (video)

सातारा : कराडात हजारो मराठा समाज बांधवांचा ठिय्या (video)

Published On: Jul 24 2018 1:02PM | Last Updated: Jul 24 2018 1:02PMकराड : प्रतिनिधी

 मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेत बलिदान केलेल्या काकासाहेब शिंदे यांना अभिवादन करत कराडमध्ये हजारो मराठा समाज बांधव मंगळवारी रस्त्यावर उतरले. दत्त चौकातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करत तहसील कार्यालयापर्यंत काढलेल्या पदयात्रेत कराडमधील वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारीही सहभागी झाले होते.

परळी (बीड) येथील मराठा समाज बांधवांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी कराड तालुका सकल मराठा समाज बांधवांनी मंगळवारी कराड तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाचे आयोजन केले होते. सकाळी साडेनऊ वाजल्यापासून कराडमधील दत्त चौकात मराठा समाज बांधव जमू लागले होते. 

तालुक्यातील हजारो समाज बांधव दत्त चौकात जमा झाल्यावर तसेच तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात आले, त्याठिकाणी कै. काकासाहेब शिंदे पाटील यांना अभिवादन करण्यात आली. त्यानंतर सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले. त्यानंतर दिवसभर ठिय्या आंदोलनात सहभागी झालेल्या मराठा समाज बांधवांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करत राज्य शासनाचा जोरदार निषेध नोंदवला.