Wed, Jul 17, 2019 18:00होमपेज › Satara › ठोसेघरचे सतरा यात्रेकरू एसटी अपघातात जखमी 

ठोसेघरचे सतरा यात्रेकरू एसटी अपघातात जखमी 

Published On: Mar 05 2018 1:45AM | Last Updated: Mar 04 2018 11:08PMपरळी : वार्ताहर

सातारा-ठोसेघर रस्त्यावरील बोरणे घाटात (ता. सातारा) रविवारी दुपारी एसटीचा  अपघात होऊन  सुमारे 17 प्रवासी जखमी झाले. ग्रामस्थांनी तत्काळ अपघातस्थळी धाव घेऊन बचावकार्य केले. ठोसेघरच्या यात्रेहून परतणार्‍या भाविकांचा जखमींमध्ये समावेश आहे.  अंजना जाधव, दिव्यास गायकवाड, रोशन गायकवाड, वंदना संकपाळ, वेदांत सपकाळ, ईश्‍वरी कदम, प्रकाश गायकवाड, करण गायकवाड, राजन हुन्‍नरकर, जगाबाई कदम, सोहम कदम, आक्‍काताई गायकवाड, वनिता गायकवाड, नंदा जाधव, कपिल राठोड, सोनू राठोड  (सर्व रा. सातारा शहर परिसर व तालुका), मंदा सपकाळ (रा. बागलेवाडी ता. पाटण) अशी जखमी झालेल्यांची नावे 

आहेत. ठोसेघरची यात्रा सुरू असल्याने बहुतांश  यात्रेकरू तिकडे गेले होते. दुपारी जांबे-सातारा ही एसटी सातारकडे येत असताना बोरणे घाटात अपघात झाला. अपघातानंतर परिसरातील ग्रामस्थांनी मदतकार्य राबवून जखमींना बाहेर काढले व उपचारासाठी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, सातारा तालुका पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.