Tue, Mar 26, 2019 22:25होमपेज › Satara › सातारा : पसरणी घाटात ट्रक कोसळला; १ ठार, २ जखमी
 

सातारा : पसरणी घाटात ट्रक कोसळला; १ ठार, २ जखमी
 

Published On: Apr 05 2018 10:51AM | Last Updated: Apr 05 2018 11:11AMवाई : प्रतिनिधी

चित्रपटाच्या शुटिंगचे साहित्य घेऊन महाबळेश्वरहून मुंबईला निघालेला ट्रक पसरणी घाटात ५०० फूट खोल दरीत कोसळला. या अपघातात ट्रकचा क्लिनर ठार झाला असून चालक आणि अन्य एक असे दोघे जण जखमी झाले आहेत. गुरुवारी(दि.५) रोजी सकाळी हा अपघात झाला.

महाबळेश्वरहून मुंबईकडे ट्रकमधून चित्रपटाच्या शुटिंगचे साहित्य नेण्यात येत होते. यावेळी ट्रक पसरणी घाटाजवळ आला असता चालकाचा ताबा सुटून ५०० फूट खोल दरीत कोसळला. अपघातात चालक व दुसरा एकजण जखमी झाला. मात्र, क्‍लिनरला जीव गमवावा लागला आहे. जखमींना उपचारासाठी वाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

Tags : satara, satara news, truck, pasarani valley