Wed, May 27, 2020 09:29होमपेज › Satara › सातारा : 'ती' ने निर्माण केला मतदारांपुढे आदर्श 

सातारा : 'ती' ने निर्माण केला मतदारांपुढे आदर्श 

Published On: Apr 23 2019 12:42PM | Last Updated: Apr 23 2019 12:42PM
तारळे : वार्ताहर

 पाटण तालुक्यातील तारळे परिसरात पुनर्वसित झालेल्या निवडे या गावातील सुप्रिया आनंदराव गोडसे या युवतीने मंगळवारी (ता.२३)सकाळी बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावला.

 सुप्रिया गोडसे हिचा वजरोशी (तालुका पाटण) येथील युवकाशी मंगळवारी विवाह होणार आहे. हा विवाह होण्यापूर्वी मंगळवारी सकाळी सव्वा दहा वाजता राहुरी येथील मतदान केंद्रावर जाऊन सुप्रिया गोडसे तिच्यासह तिच्या कुटुंबीयांनी मतदानाचा हक्क बजावला. या कृतीतून गोडसे कुटुंबीयांनी मतदानाकडे कामाचे कारण सांगून पाठ फिरवणार्‍या मतदारांपुढे आदर्श निर्माण केला आहे.

लग्‍नाच्‍या नंतर सुप्रिया आनंदराव गोडसे आयुष्‍यातील नवीन पर्वाला सुरुवात करणार आहे. मात्र जबाबदार नागरिक म्‍हणून लग्‍नाच्‍या दिवशी मतदान करुन सुप्रियाने मतदारांच्‍या समोर आदर्श निर्माण केला.