Tue, Mar 26, 2019 22:20होमपेज › Satara › लग्नाच्या दुसर्‍या दिवशी नवविवाहितेचे पलायन

लग्नाच्या दुसर्‍या दिवशी नवविवाहितेचे पलायन

Published On: Feb 10 2018 1:38AM | Last Updated: Feb 09 2018 10:57PMसातारा : प्रतिनिधी

सातारा बसस्थानकात घुटमळत असणार्‍या विवाहित महिलेला पोलिसांनी हटकल्यानंतर समोर आलेली माहिती हादरवून सोडणारी निघाली. 5 फेब्रुवारीला लग्न झाल्यानंतर दुसर्‍याच दिवशी ती विवाहिता पहिल्या प्रेमासाठी औरंगाबादहून पळून आल्याचे समोर आले. घटनेचे गांभीर्य ओळखून सातारा पोलिसांनी औरंगाबाद पोलिसांशी संपर्क साधून त्यांच्या स्वाधीन केले.

याबाबत अधिक माहिती अशी, शुक्रवारी एक नवविवाहित महिला सातारा बसस्टँड परिसरात घुटमळत होती. पोलिसांनी संबंधित महिलेला हटकल्यानंतर तिने स्टोरी सांगण्यास सुरुवात केली. औरंगाबाद येथील एका मुलाशी तिचे प्रेमसंबंध होते. मात्र, घरच्या मंडळींनी तिच्या इच्छेविरुध्द दुसर्‍याशी लग्न लावून दिले. विवाह झाल्यानंतर 24 तासातच तिने पळ काढला. प्रियकराला फोन करुन बोलावून घेवून दोन दिवस बाहेरच भरकटत काढले.

सातार्‍यात गुरुवारी रात्री एका पुलाखाली त्या नवविवाहितेने मुक्‍काम केल्याचे समोर आले. सर्व प्रकार ऐकल्यानंतर विवाहितेचा प्रियकर काही वेळाने आला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून दोघांना औरंगाबाद पोलिसांकडे सुपुर्द केले. पोलिस चौकीचे हवालदार प्रवीण पवार, दत्ता पवार, अरुण दगडे, केतन शिंदे यांनी ही कामगिरी केली.