होमपेज › Satara › ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ठिय्या (video)

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ठिय्या (video)

Published On: Aug 23 2018 12:36PM | Last Updated: Aug 23 2018 1:01PMफलटण : प्रतिनिधी

 न्यू फलटण शुगर्सने उसाचे पेमेंट गेली दहा महिने दिले नसल्याने शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी तहसीलदार कार्यालयात ठिय्या मांडला आहे.  पैसे घेतल्या शिवाय अथवा कारखाना प्रशासनावर गुन्हे दाखल करून व कारखान्याची मालमत्ता जप्त  करून पैसे दिल्याशिवाय येथून जाणार नसल्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.

गेल्या अनेक वेगवेगळ्या बैठकीत आज देतो, उद्या देतो असे म्हणून कारखाना प्रशासनाने आमची फक्त बोळवण केली आहे. त्यामुळे संघटनेचे पदाधिकारी आणि शेतकरी आक्रमक झाले होते. याबाबत तहसीलदार विजय पाटील यांच्याशी चर्चा केली. यावेळी एका शेतकऱ्याने एका तासात पैसे न दिल्यास आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे.