Wed, Feb 20, 2019 10:41होमपेज › Satara › सातारा : चालत्या रेल्‍वेतून पडून युवकाचा मृत्यू

सातारा : चालत्या रेल्‍वेतून पडून युवकाचा मृत्यू

Published On: Apr 24 2018 7:12PM | Last Updated: Apr 24 2018 7:12PMकोरेगाव : प्रतिनिधी

कोरेगाव रेल्‍वे स्‍थानकाजवळ असणार्‍या वसना वंगना नदीपुलावरून नदीपात्रात पडून १९ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. प्रद्युम्‍न रमाकांत सोनी असे मृत युवकाचे नाव आहे. तो सांगलीहून झाशीकडे निजामुद्दीत एक्‍सप्रेसने चालला होता. घटनेची नोंद सातारा रेल्‍वे पोलिसांत झाली आहे. 

प्रद्युम्‍न हा सांगली जिल्‍ह्यातील कुपवाड एमआयडीसीमध्ये बेदाणा प्रोसेसिंग कारखान्यात कामाला आहे. प्रद्युम्‍न व त्याचा चुलत भाऊ राहुल सोनी हे सुट्टी घेऊन उत्तर प्रदेशातील करगूना जि. झाशी या गावी चालले होते. सकाळी प्रवास सुरू केल्यानंतर दुपारी १२.४५ च्या सुमारास रेल्‍वेने कोरेगाव स्‍टेशन ओलांडले. 

प्रद्युम्‍न रेल्‍वेचा दरवाजावजळ उभा असताना तो पुलवारून खाली नदीपात्रात पडला. यावर राहुल सोनी याने तात्‍काळ रेल्‍वेची धोक्याची सूचना देणारी साखळी ओढली. गाडी शिरढोन फाटकाला थांबल्याने रस्‍त्याची वाहतूक काही काळ थांबली होती. 

अपघातानंतर रेल्‍वे प्रवाशांनी घटनास्‍थळाकडे धाव घेतली. परंतु, दीडशे फूट उंचीच्या पुलारून खोल कोरड्या नदीपात्रात पडल्याने प्रद्युम्‍नचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती नातेवाईकांना देण्यात आली आणि शवविच्‍छेदनासाठी कोरेगाव ग्रामीण रुग्‍णालयात नेण्यात आले. अधिक तपास रेल्‍वे सुरक्षा दलाचे विभागीय उपनिरीक्षक हणमंत पवार करीत आहेत. 

Tags : satara, koregaon, nijamuddin express, train,