Thu, Nov 15, 2018 10:37होमपेज › Satara › सातारा : लाच घेताना तलाठी दुसऱ्यांदा अटक

सातारा : लाच घेताना तलाठी दुसऱ्यांदा अटक

Published On: Jun 15 2018 4:18PM | Last Updated: Jun 15 2018 4:18PMफलटण : प्रतिनिधी

निंबळक (ता. फलटण) येथील तलाठी श्रीमंत दिनकर रणदिवे यांना एक हजाराची लाच घेताना पकडले. धक्कादायक बाब म्हणजे नोकरीत असताना दोन वेळा लाचलुचपत विभागाने त्याला पकडले असून फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, एका महिलेने गावठाण क्षेत्रात जागा खरेदी केली होती. यामुळे ही जागा नावावर करण्यासाठी ती महिला रणदिवे यांना वेळोवेळी नोंदीची विनंती करीत होती. मात्र रणदिवे हे त्या महिलेला पैशांची मागणी करत होते. यामुळे या महिलेने लाचलुचपत खात्याकडे तक्रार केली. आज शुक्रवारी दुपारी पोलिस निरीक्षक बयाजी कुरळे व इतर अधिकाऱ्यांनी सापळा रचला व एक हजाराची लाच घेताना ताब्यात घेतले.

फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू असून २०१२ साली अगोदरचा गुन्हा दाखल असताना व त्याचा निकाल लागला नसताना रणदिवे यांना पुन्हा लाचलुचपत खात्याने पकडले असून सातारा जिल्ह्यातील ही पाहिली घटना ठरली आहे. पहिल्या खटल्याचा निकाल लागण्यापूर्वीच दुसऱ्या गुन्ह्यात रणदिवे सापडल्याची चर्चा सुरू आहे.