Sat, Apr 20, 2019 08:46होमपेज › Satara › अ‍ॅथलेटिक्स, बॅडमिंटनमध्ये पुणे, नागपूरची बाजी

अ‍ॅथलेटिक्स, बॅडमिंटनमध्ये पुणे, नागपूरची बाजी

Published On: Feb 14 2018 2:56AM | Last Updated: Feb 13 2018 10:55PMसातारा : प्रतिनिधी 

जलसंपदा विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत अ‍ॅथलेटिक्सच्या विविध क्रीडा प्रकारांमध्ये महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाने यश मिळवले. तर, बॅटमिंटन स्पर्धेत विदर्भ पाटबंधारे महामंडळ नागपूरने बाजी मारली. जलतरण स्पर्धेत महिला स्पर्धकांनी कडवी झुंज देवून  नेत्रदिपक कामगिरी केली.  छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात जलसंपदा विभागाच्यावतीने विविध क्रीडा सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते.

अ‍ॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये 100 मीटर धावणे स्पर्धेत महिला गटात अनुक्रमे ऐश्‍वर्या पवार, प्रियंका कराड, प्रज्ञा जगताप तर पुरुष गटात अनुक्रमे हरीष पावडे, भरत रेड्डी आणि हणमंत गाडे; 200 मीटर धावणे महिला गटात अनुक्रमे ऐश्‍वर्या पवार, वर्षा शेळके, अस्मिता माळी तर पुरुष गटात अनुक्रमे गिरीश बनसोडे, भरत रेड्डी, हणमंत गाडे; 400 मीटर्स धावणे महिला गटात अनुक्रमे ऐश्‍वर्या पवार, वर्षा शेळके, पूजा मछले तर पुरुष गटात अनुक्रमे गिरीश बनसोडे, भरत रेड्डी, पंकज डेंगे; 400 मीटर्स धावणे (50 वर्षावरील) महिला गटात लता मोगल; 4 × 100 मी. रिलेत महिला गटात अनुक्रमे स्वाती डगळे, संगीता मोरे, प्रियंका कराड,

अमृता डेरे, पूजा मछले, प्रज्ञा जगताप, स्नेहल खंदारे, अस्मिता माळी, अनुप्रिया जाधव, अपेक्षा कापसे, कमल माळी, सायली भागवत तर पुरुष गटात अनुक्रमे हणमंत गाडे, अभिषेक साळवे, भरत रेड्डी, सुधाकर सावंत, हरीष पावडे, किशोर दगडे, वसीम गडकरी, कपिल कुंभरे, संतोष मिसाळ, गिरीश बनसोडे, वसीम खान, सुनील शिंदे विजेते ठरले. 
3 कि.मी. धावणे स्पर्धेत महिला गटात अनुक्रमे रामेश्‍वरी कांचनगिरे, पूजा मछले, आरत नेहारे तर पुरुष गटात अनुक्रमे गिरीष बनसोडे, भरत रेड्डी, राजू पाचपोळ; 3 कि.मी. धावणे (50 वर्षावरील) स्पर्धेत अनुक्रमे अनिल जाधव, तेजूद्दीन शेख, विजय जाधव, 10 कि.मी. धावणे महिला गटात अनुक्रमे रामेश्‍वरी कांचनगिरे, पुजा मछले, कमल माळी तर पुरुष गटात गिरीश बनसोडे, राजन पाचपोळ, राजन रेड्डीयार; 10 किमी धावणे (50 वर्षावरील) पुरुष गटात अनुक्रमे अनिल जाधव, गणेश जाचक, विजय जाधव; लांब उडीत महिला गटात अनुक्रमे पूनम पर्‍हाडकर, पूजा मछले, संगीता मोरे तर पुरुष गटात अनुक्रमे बिपीन कदम, हणमंत गाडे, गिरीष बनसोडे यांनी यश मिळवले. 

जलतरणमध्ये 50 मीटर फ्री स्टाईल महिला गटात अनुक्रमे अनघा भोसकर, शीतक केत, चंदा बुक्‍तारे; पुरुष गटात अनुक्रमे  कौस्तुभ बेनकर, श्रीकांत माळी, संतोष नाईक; जलतरण 100 फ्री स्टाईल महिला गटात अनुक्रमे अनघा भोसकर व चंदा बुक्‍तारे तर पुरुष गटात श्रीकांत माळी व हणमंत मोरे; 50 मीटर बॅक स्ट्रोक महिला स्पर्धेत अनुक्रमे अनघा भोसकर, चंदा बुक्‍तारे तर पुरुष गटात अनुक्रमे  कौस्तुभ बेनकर, श्रीकांत माळी, हणमंत मोरे; 100 मीटर बॅक स्ट्रोक स्पर्धेत महिला गटात अनघा भोसकर, चंदा बुक्‍तारे तर पुरुष गटात अनुक्रमे  दौलत महाले, आत्माराम कापसे, नरेंद्र गिरासे; 50 मीटर बेस्ट स्ट्रोक महिला स्पर्धेत अनुक्रमे अनघा भोसकर, शीतल केत, चंदा बुक्‍तारे तर पुरुष गटात अनुक्रमे कौस्तुभ बेनकर, पिवळतकर, संजय पाटील; 100 मीटर बेस्ट स्ट्रोक महिला स्पर्धेत अनुक्रमे अनघा भोसकर, चंदा बुक्‍तारे तर पुरुष गटात अनुक्रमे शिवाजी पाटील, संजय पाटील, पुंडलिक बरसट विजेते ठरले.

बॅडमिंटन महिला एकेरी गटात अनुक्रमे स्नेहल खंदारे, ममता सपकाळे तर पुरुष गटात अनुक्रमे  थोरात, सचिन पाटील; बॅडमिंटन महिला दुहेरी गटात अनुक्रमे नितू चव्हाण व श्‍वेता रणनवरे, सायली इनामके व ऋतुजा चव्हाण तर पुरुष गटात अनुक्रमे सचिन पाटील व अविनाश शर्मा, सुरेंद्र पवार व संदीप काकडे; बॅडमिंटन मिश्र स्पर्धेत अनुक्रमे अविनाश शर्मा व मेघा अमृतकर तर अली शेख व नूतन भानूवंशे; बॅडमिंटन दिव्यांग एकेरी गटात अनुक्रमे संतोष पाडगावकर व रणजीत बोंबले यांनी यश मिळवले.