Sun, Aug 25, 2019 12:42होमपेज › Satara › सामाजिक प्रश्‍नांवर ‘पुढारी’नेच सर्जिकल स्ट्राईक करावा

सामाजिक प्रश्‍नांवर ‘पुढारी’नेच सर्जिकल स्ट्राईक करावा

Published On: Jan 03 2018 1:18AM | Last Updated: Jan 02 2018 11:21PM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी

‘पुढारी’ने आजपर्यंत विविध क्षेत्रात पुढारपण केले असून सामाजिक चळवळीला दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत राज्यासह देशाच्या सामाजिक व राजकीय पटलावर आमूलाग्र बदल झाला आहे. नवी आव्हाने उभी ठाकली आहेत. अशावेळी निर्भीडपणे  लोकभावना व्यक्त करणारे प्रभावी व हक्काचे साधन म्हणून ‘पुढारी’कडे पाहिले जाते. महाराष्ट्राच्या जडणघडणीतील एक सामाजिक विचार बनलेल्या ‘पुढारी’ची खमक्या भूमिका अशावेळी निर्णायक ठरणार असून कोणत्याही सामाजिक प्रश्‍नांवर सर्जिकल स्ट्राईक करावा तो फक्त ‘पुढारी’नेच, अशा शब्दात राज्याचे सर्वोच्च सभागृह असलेल्या विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे ना. निंबाळकर यांनी ‘पुढारी’विषयी गौरवोद्गार काढले.

सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक खपाच्या व प्रथम क्रमांकाच्या दै. ‘पुढारी’चा वर्धापनदिन दणक्यात व जल्लोषात साजरा झाला. यावेळी हॉटेल लेक व्ह्यूच्या संस्कृती लॉनवर सातारा कार्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या दिमाखदार स्नेहमेळाव्याचे उद्घाटन  ना. रामराजे ना. निंबाळकर  यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी     आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. जयकुमार गोरे,  जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, भाजप नेते मनोजदादा घोरपडे, शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील,  शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव, शेतकरी संघटनेचे नेते शंकरराव गोडसे, शिक्षक संघाचे नेते सिद्धेश्‍वर पुस्तके यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रमुख, संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

ना. रामराजे पुढे म्हणाले, 1 जानेवारीला मी कुठेही जात नाही. दरवर्षी ‘पुढारी’त यायचे आणि नव्या वर्षाला सुरूवात करायची हा आता पायंडाच पडला आहे. ‘पुढारी’ने मला खूप दिले आहे. हे मी कधी विसरूच शकणार नाही. ‘पुढारी’ने आजपर्यंत विविध क्षेत्रात पुढारपण केले असून सामाजिक चळवळीला दिशा देण्याचे महत्वपूर्ण काम केले आहे. प्रश्‍नांची तड लावणारा व सर्वसामान्यांपासून राजकीय धुरिणांपर्यंत सर्वांना आपला वाटणारा ‘पुढारी’ विविध सामाजिक प्रश्‍नांच्या सोडवणुकीत महत्वपूर्ण भूमिका घेत असतो. हे यावेळी मला पुन्हा एकदा आवर्जून सांगायचे आहे. त्याला अनेक संदर्भ आहेत. देश व राज्यातील  परिस्थिती वेगळ्याच टप्प्यावर आहे. अशावेळी माध्यमांची विशेषत: ‘पुढारी’ची भूमिका महत्वपूर्ण ठरणारी आहे.

सामाजिकतेवर व राज्याच्या एकतेवर आक्रमणे होवू लागली आहेत. नवा विचार स्वीकारला जात आहे. तो स्वीकारताना चांगल्या - वाईटाची संकल्पनाही बदलल्याचे दिसत आहे. खदखदणारे विदारक वास्तव समाजासमोर आले पाहिजे. त्यासाठी माध्यमांनी आपले लोकसेवेचे व्रत जपले पाहिजे. ‘पुढारी’ने प्रत्येक वेळी लोकांबरोबर, वाचकांबरोबर राहून विधायकता निभावली आहे. म्हणूनच  या पुढील काळात ‘पुढारी’च  लोकांसाठी दीपस्तंभ ठरणार आहे. ‘पुढारी’चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी  दैनिकाच्या माध्यमातून समाजाच्या जडणघडणीचे हाती घेतलेले कार्य जोमाने सुरु ठेवले असल्याचे सांगून ना. रामराजे यांनी  ‘पुढारी’ने ज्या ताकतीने पत्रकारितेचा बाणा जपला आहे ते पाहून निश्‍चितच अभिमान वाटत असल्याचे सांगितले.

यावेळी मान्यवरांचे स्वागत दै. ‘पुढारी’चे विभागीय व्यवस्थापक जीवनधर चव्हाण, वृत्तसंपादक हरीष पाटणे, जाहिरात विभाग प्रमुख नितीन निकम यांच्यासह ‘पुढारी’ परिवाराने केले. प्रारंभी ‘पुढारी’चे संस्थापक पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन ना. रामराजे ना. निंबाळकर यांच्यासह मान्यवरांनी केले. यावेळी ‘पुढारी’ने प्रसिद्ध केलेल्या ‘व्हिजन न्यू इंडिया  नवभारत नवनिर्मितीचे स्वप्न’ या विशेषांकाचे प्रकाशनही करण्यात आले. वर्धापनदिन सोहळ्यास  किसन वीर कारखान्याचे चेअरमन मदनदादा भोसले, काँग्रेसचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. विजयराव कणसे, माजी आमदार प्रभाकर घार्गे, डॉ. दिलीप येळगावकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक नितीनकाका पाटील, खा. उदयनराजे भोसले यांचे समर्थक सुनील काटकर, सातारच्या नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, पाचगणीच्या नगराध्यक्षा सौ. लक्ष्मी कर्‍हाडकर, कोरेगावचे नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती राजेश पवार, कृषि सभापती मनोज पवार, समाज कल्याण सभापती शिवाजी सर्वगौड, महिला बालकल्याण

सभापती सौ. वनिता गोरे, खटावचे सभापती संदीप मांडवे, सातार्‍याचे सभापती मिलींद कदम, अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख विजय पवार, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी. बी. पाटील, नूतन निवासी उपजिल्हाधिकारी सचिन बारवकर, उपजिल्हाधिकारी अविनाश शिंदे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता विजय घोगरे, जिल्हा उपवन संरक्षक  अनिल अंजनकर, जिल्हा पुनर्वसन अधिकारी आरती भोसले, सातार्‍याच्या प्रांताधिकारी डॉ. स्वाती देशमुख, कोरेगावच्या प्रांताधिकारी किर्ती नलावडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी सौ. पुनिता गुरव, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुहास नाडगौडा, उपजिल्हाधिकारी संजय पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी खंडेराव धरणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीकांत भोई, एलसीबीचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप, जिल्हा नियोजन अधिकारी बी. जे. जगदाळे,  जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल (नि.) राजेंद्र जाधव, जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.