Tue, Apr 23, 2019 01:36होमपेज › Satara › सातारा समितीची शिवजयंती दिल्लीत 

सातारा समितीची शिवजयंती दिल्लीत 

Published On: Feb 16 2018 1:49AM | Last Updated: Feb 15 2018 11:34PMसातारा : प्रतिनिधी

शिवजयंती ही केवळ महाराष्ट्रात नव्हे तर समस्त हिंदुस्थानात साजरी व्हावी ही प्रत्येक शिवभक्तांची इच्छा आहे. यंदा प्रथमच शिवजयंती नवी दिल्ली येथे साजरी केली जात असून  सातारच्या शिवराज्याभिषेक दिन उत्सव समितीचे पथक यात सहभागी होत असल्याची माहिती संस्थापक सुदामदादा गायकवाड व अध्यक्ष दीपक प्रभावळकर यांनी दिली.  शिवजयंती सार्‍या महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरी होतेच पण ती देशभरात साजरी होऊन शिवजयंती हा राष्ट्रोत्सव करण्याचे  सार्वत्रिक प्रयत्न होत आहेत.

खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या पुढाकाराने दिल्लीत दोन दिवसीय राष्ट्रोत्सव आयोजित केला जात आहे. या राष्ट्रोत्सवात विविध उपक्रमाची रेलचेल असून शिवजन्मोत्सव सोहळा, शोभा यात्रा, राजपथावरून भव्य मिरवणूक, हत्ती, घोडे, उंट यांचा सहभाग होणार आहे. अभिवादन, साहसी खेळ, शस्त्रांचे प्रदर्शन अशा अस्सल  मराठमोळ्या कार्यक्रमांनी संपूर्ण दिल्ली शिवमय करण्याचा मनोदयही यावेळी व्यक्त करण्यात आला.   दरम्यान, दिल्लीला रवाना होणार्‍या पथकाला जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे, मराठा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, समाजसेवक कन्हैय्यालाल राजपुरोहित, दत्ताजी भोसले यांनी शुभेच्छा दिल्या.