Thu, Nov 15, 2018 16:15होमपेज › Satara › सातारा : शाहुपूरीत घरफोडी ; दीड लाखांचा मुद्देमाल लंपास

सातारा : शाहुपूरीत घरफोडी ; दीड लाखांचा मुद्देमाल लंपास

Published On: Sep 04 2018 4:01PM | Last Updated: Sep 04 2018 4:01PMसातारा : प्रतिनिधी 

शाहुपूरीतील महालक्ष्मी कॉलनीत चोरट्यांनी घराफोडी करून १ लाख 62 हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याबाबत शाहुपूरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, फिर्यादी शकील ईस्माईल बन्ने (वय ५२, रा. बुधवार पेठ) यांचे बुधवार पेठेत घर आहे.  मात्र, सध्या या घराचे बांधकाम सुरू असल्याने ते शाहुपूरी येथील पाहुण्यांच्या घरी झोपण्यास जातात. ३१ ऑगस्ट ते दि. ३ सप्टेंबर या कालावधीत ते शाहुपूरी येथील घरी गेले नव्हते. मात्र, दि. ३ रोजी घरी गेल्यानंतर घरफोडी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यावेळी त्यांचे घर फोडल्याचे निदर्शनास आले.

अज्ञात चोरटयाने ४० हजार रूपये किमतीच्या दोन तोळ्याच्या बांगड्या, २० हजाराचे एक तोळ्याचे सोन्याचे कडे, ४० हजाराचे दोन तोळ्याचे झुबके, ३० हजाराची  दीड तोळ्याची मोहनमाळ, २ हजाराच्या चांदीच्या बेड्या असा सुमारे १ लाख ६२  हजार रूपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे.