Sun, Nov 18, 2018 09:08होमपेज › Satara › रस्ता सुरक्षा बैठकीला सदस्यांनीच उपस्थित रहावे ; खा. उदयनराजे

रस्ता सुरक्षा बैठकीला सदस्यांनीच उपस्थित रहावे : खा. उदयनराजे

Published On: Feb 16 2018 1:49AM | Last Updated: Feb 15 2018 10:39PMसातारा : प्रतिनिधी

रस्ता सुरक्षा हा विषय अत्यंत गंभीर असून पुढील बैठकीला समितीमधील सर्व सदस्यांनी उपस्थित रहावे.  प्रतिनिधी न पाठवण्याच्या सूचना  खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी विविध  विभागाच्या अधिकार्‍यांना  केल्या. केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या आदेशानुसार जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीची स्थापना करून समितीची बैठक खा. उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत झाली.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झालेल्या बैठकीस  निवासी उपजिल्हाधिकारी सचिन बारावकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे, अजित शिंदे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी योगेश बाग, अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार उपस्थित होते. रस्ते अपघात कमी करण्यासाठी ज्या काही योजना असतील त्यासाठी लागणारा निधी केंद्र व राज्य शासन किंवा खासदार निधीतून  दिला जाईल, असे आश्‍वासनही खा. उदयनराजे भोसले यांनी दिले.