होमपेज › Satara ›  कराडच्या नगरअभियंत्यांना विचारला जाब (video)

सातारा : मनसेचे रस्त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह (video)

Published On: Jul 23 2018 6:34PM | Last Updated: Jul 23 2018 6:36PMकराड : प्रतिनिधी 

कराडमध्ये माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या निधीतून तसेच कराड नगरपालिकेच्या फंडातून 21 कोटींचा खर्च करून केलेल्या रस्त्याच्या कामांचा दर्जा निकृष्ट असल्याने वर्षभरातच रस्ते उखडले आहेत. काही ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. तरीही नगरपालिका प्रशासन ठेकेदारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत मनसे पदाधिकाऱ्यांनी सोमवारी दुपारी कराड पालिकेचे नगरअभियंता एम. एच. पाटील यांना चांगलेच धारेवर धरले.

मनसेचे जिल्हाध्यक्ष अॅड. विकास पवार, उपजिल्हाध्यक्ष महेश जगताप, सागर बर्गे, दादा शिंगण, आशिष रैनाक, नितीन महाडिक यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांनी सोमवारी नगरपालिकेत नगर अभियंता एम. एच. पाटील यांची भेट घेत त्यांना रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाबद्दल जाब विचारला. ठेकेदारांना काळ्या यादीत घालण्याची मागणी करत नगरपालिकेने योग्य ती कार्यवाही न केल्यास मनसे स्टाईल आंदोलन करू, असा इशाराही यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला.