Thu, Apr 25, 2019 07:31होमपेज › Satara › फलटण पोलिसांचा झिंगाट डान्स (व्हिडिओ)

फलटण पोलिसांचा झिंगाट डान्स (व्हिडिओ)

Published On: Jan 09 2018 4:55PM | Last Updated: Jan 09 2018 4:57PM

बुकमार्क करा
 

फलटण : प्रतिनिधी

शहर व तालुक्यातील पत्रकारांच्यावतीने पत्रकार दिनानिमित्त स्व. हरिभाऊ निंबाळकर स्मृतीचषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  या स्पर्धेतील अंतिम सामन्यात फलटण शहर पोलिसांच्या संघाने स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या पत्रकारांच्या संघाला पराभूत करत चषकावर नाव कोरले.  अंतिम सामन्यातील विजयानंतर फलटण शहर पोलीस आणि उपविजेत्या पत्रकार संघाने  डीजेवर ठेका धरल्याचे पाहायला मिळाले.

यामध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी संतोष जाधव, फलटण शहरचे पोलिस निरीक्षक प्रकाश सावंत, ग्रामीण पोलिस पोलिस निरीक्षक अशोक शेळके, सर्व पत्रकार व पोलिस कर्मचारी यांनी नाचून आनंद व्यक्त केला.