Tue, May 21, 2019 04:10होमपेज › Satara › सातारा : पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य अपघातात  ठार 

सातारा : पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य अपघातात  ठार 

Published On: Mar 21 2018 2:23PM | Last Updated: Mar 21 2018 2:23PMसातारा : प्रतिनिधी

सोनगाव ता.सातारा गावच्या हद्दीत बुधवारी दुपारी दोन दुचाकींच्या झालेल्या भीषण अपघातात पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य असिफ मणेर हे जागीच ठार झाले. अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. 

याबाबत प्राथमिक माहिती अशी,  बुधवारी दुपारी प्राचार्य असिफ मणेर हे दुचाकीवरुन निघाले होते. त्यांची दुचाकी सोनगाव गावच्या हद्दीत कुरणेश्वर घाटात आल्यानंतर याचवेळी दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेवून इतर जखमींना बाहेर काढून उपचारासाठी नेले. दरम्यान, मृत व्यक्ती प्राचार्य असल्याची माहिती समोर आली.

या घटनेची माहिती कॉलेजमध्ये पसरल्यानंतर शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. काही तरूणांनी जिल्हा रूग्णालयात गर्दी केली.  तालुका पोलिसांना अपघाताची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. उशीरापर्यंत पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Tags : Satara,news, Poletechnic college, Principal, Dead,Two Wheeler Crash Accident,