Sat, Apr 20, 2019 08:29होमपेज › Satara › सातारा :  सेंट्रल रेल्वेकडून दोनशे कुंटुबांना नोटीस (video)

सातारा :  सेंट्रल रेल्वेकडून दोनशे कुंटुबांना नोटीस (video)

Published On: Aug 31 2018 11:09AM | Last Updated: Aug 31 2018 11:09AMलोणंद : प्रतिनिधी 

लोणंदच्या रेल्वे स्टेशन नजीकच्या सरकारी जागेवर वर्षानुवर्षे झोपडी, पत्र्याचे शेड, वाकळापासुनचे छत आदी  छप्पर वजा घरामध्ये राहणाऱ्या अत्यंत गरीब , बेघर अशा सुमारे दोनशे कुंटुबांना ही जागा खाली करण्याच्या नोटीसा सेंट्रल रेल्वेकडून देण्यात आल्या आहेत. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, एस.टी. स्टॅन्ड पाठीमागील बाजू, डोंबार वस्ती, वडार समाज वस्ती, घिसाड समाज वस्ती या भागातील नागरिकांना आलेल्या या नोटीसामुळे  हातावर पोट असणाऱ्या गरिबांच्या  डोक्यावरील छपराचा आधार जाणार या भीतीने अक्षरक्षा झोप उडाली आहे.

बेघरांना बेघर करण्याचे काम रेल्वे प्रशासन करीत आहे. ही गरीब कुंटुबे रेल्वेकडून  आलेल्या नोटीसामुळे सैरभैर झाली आहेत. या संकटातून  सुटका करून आमचे घर तोडू नका,  अशी आर्त हाक देत आहेत. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी स्थानिक नेत्याबरोबर लोकप्रतिनिधीनीही पुढाकार घेण्याची गरज आहे.