Thu, Jul 02, 2020 23:19होमपेज › Satara › निर्मला सीतारामन यांच्याकडून अर्थव्यवस्‍थेचे भले होणार नाही : पृथ्‍वीराज चव्हाण 

निर्मला सीतारामन यांच्याकडून अर्थव्यवस्‍थेचे भले होणार नाही : पृथ्‍वीराज चव्हाण 

Last Updated: May 26 2020 4:58PM
कराड : पुढारी वृत्तसेवा

केंद्र सरकारने जनतेला थेट पैसे देणे आवश्यक आहे. अमेरिका, इंग्लंड, जर्मनी या सारख्या देशात हेच धोरण अवलंबले जात आहे. केंद्र सरकारने वीस लाख कोटी पॅकेजची घोषणा केली आहे. मात्र केंद्र सरकार जनतेला थेट पैसे देण्यास तयार नाही. जनतेचे प्रश्न त्यांना समजलेलेच नाहीत. त्यामुळे निर्मला सीतारामन यांच्याकडून देशाच्या अर्थव्यवस्थेचे भले होणार नाही, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

त्याचबरोबर राज्यपालांच्या भूमिकेबाबत शंका उपस्थित करत, भाजप सत्तेला हपापलेला पक्ष आहे. त्यांना कोणत्याही प्रकारे सत्ता मिळवायची आहे. राष्ट्रपती राजवटीचा विषयच येत नाही. कोरोनाच्या देशातील सर्वाधिक टेस्ट महाराष्ट्रात होत आहेत. त्यामुळेच महाराष्ट्रातील रुग्ण संख्या देशात सर्वाधिक आहे. जी राज्य कोरोनाच्या टेस्ट करण्याकडे दुर्लक्ष करतात अथवा टेस्ट कमी करतात ती राज्य आम्हाला शिकवणार का? असा उपरोधिक टोलाही आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी या वेळी लगावला.