Mon, Mar 25, 2019 04:56
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › धक्कादायक; कचऱ्यात अर्भके पुरली जातात (video)

धक्कादायक; कचऱ्यात अर्भके पुरली जातात (video)

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

सोनागावची ओळख 'कचरा डेपो' अशी झाली आहे. कचरा कुजल्याने तयार झालेल्या मिथेन वायूने लोक आजारले. नगर पालिकेने कचरा प्रकल्पासाठी दिलेल्या जागेचा वापर कचरा डेपोसाठी केला. त्याठिकाणी जैविक कचरा टाकला जात आहे. ग्रामपंचायतींना कचरा टाकण्यास मुभा दिली जात आहे. महिन्यात उपाययोजना न केल्यास मुला बाळांसह रस्त्यावर उतरून कचरा डेपोवर टाळे ठोक आंदोलन करणार, असा इशारा सोनागाव ग्रामस्थांनी बैठकीत दिला. अर्भके पुरली जात असल्याचा धक्कादायक खुलासा ग्रामस्थांनी केला आहे.

सातारा नगर पालिकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात नागराध्यक्षा सौ. माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी मुख्याधिकारी शंकर गोरे, पोलीस निरीक्षक जाधव, लेखापाल विवेक जाधव प्रमुख  उपस्थिती होते. सोनगाव कचरा डेपोचे वायू प्रदूषण बंद करण्यासाठी मंगळवारपासून उपाययोजना केल्या जातील. खा. श्री. छ.  उदयनराजे भोसले यांच्या प्रयत्नामुळे 16 कोटींचा घनकचरा प्रकल्प मंजूर झाला आहे. या प्रकल्पाचे काम महिन्यात सुरु केले जाईल. सोनागाव ग्रामस्थांनी विश्वास ठेवावा. गैरसमज करून घेऊ नये. आंदोलन न करता सहकार्य करावे, असे आवाहन नागराध्यक्षा सौ. माधवी कदम यांनी केले. मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी कचरा व्यस्थापन तसेच  प्रकल्पाची माहिती दिली. यावेळी आरोग्य अधिकारी राजेंद्र कायगुडे, यादव, रणदिवे, टोपे आदी उपस्थित होते.

Tags : Satara, News,infant,Garbage, Villagers, Police, Crime, Child, Hospital   
 


  •