Thu, Jul 18, 2019 16:30होमपेज › Satara › पालिकेच्या घनकचरा प्रकल्पाचे भूमिपूजन

पालिकेच्या घनकचरा प्रकल्पाचे भूमिपूजन

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

सातारा नगरपालिकेच्या महत्वाकांक्षी योजनांपैकी एक असलेला सोनगाव येथील घनकचरा प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.   या प्रकल्पाच्या कामास सुरुवात झाल्याने सोनगाव ग्रामस्थांनी समाधानाचे वातावरण आहे. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी सुमारे 15 कोटी 34 लाखांच्या प्रकल्पास मंजुरी मिळवली. त्यामुळे शहरातील विकासकामे मार्गी लावत असतानाच याही प्रकल्पाचा शुभारंभ मंगळवारी नगराध्यक्षांच्या हस्ते करण्यात आला.

त्यावेळी मुख्याधिकारी शंकर गोरे, आरोग्य सभापती यशोधन नारकर, बांधकाम सभापती मनोज शेंडे, लेखापाल विवेक जाधव, नगरसेवक वसंत लेवे, विशाल जाधव, ज्ञानेश्‍वर फरांदे, धनंजय जांभळे, आरोग्य विभागाचे भाग निरीक्षक यादव, रणदिवे, सोनगाव सरपंच नावडकर प्रमुख उपस्थित होते. घनकचरा प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात सुरक्षा रक्षक केबिन, वजन काटा, विंड्रो कंपोस्टिंग शेड उभारण्यात येणार आहे.

त्यानंतर अंतर्गत रस्ते, दिवे, संरक्षक भिंतीची दुरुस्ती, गेट, पाणी यांची सोय करण्यात येणार आहे. कचर्‍याचे प्रोसेसिंग शेड उभारण्यात येणार आहे. कचर्‍याचे बायोमायनिंग करुन त्याठिकाणी ओला व सुका कचरा वेगळा करण्यात येणार आहे. विघटन न होणार्‍या कचर्‍याचा शास्त्रीय भूभराव (सायंटिफिक लँडफिल) करण्यात येणार आहे. या योजनेतूनच नव्याने जेसीबी, 2 बलोरे, कॉम्पॅक्टर, टिपर, ट्रॅक्टर खरेदी करण्यात येणार आहे. या वाहनाचा वापर या प्रकल्पासाठी केला जाणार आहे. एस. इन्फ्रा कंपनीकडून हा प्रकल्प उभारण्यात येत आहे.
 

 

 

tags ; Satara,news, Municipality,Sonagava, waste, project, launched,work,


  •