होमपेज › Satara › सातारा : पाटणमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग : शिक्षकासह शिपायावर गुन्हा

सातारा : पाटणमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग

Published On: Jul 14 2018 3:00PM | Last Updated: Jul 14 2018 5:19PMमारूल हवेली : वार्ताहर

शिक्षक आणि विद्यार्थी या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना बहुले (ता. पाटण, जि. सातारा) परिसरात घडली आहे. एका शाळेत विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षक व शाळेच्या शिपायावर अॅट्रोसिटी कायद्यासह पोक्सो कायद्यान्वये मल्हारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्षक अरुण पानस्कर  (रा. दिवशी) व शिपाई विठ्ठल चव्हाण (रा. म्हावशी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. पाटण तालुक्यातील एका नामांकित शिक्षण संस्थेच्या विद्यालयात शुक्रवारी हा प्रकार घडला आहे. प्रयोगशाळेत बोलवून घेत अल्पवयीन विद्यार्थिनीशी शिक्षकाने गैरवर्तन केल्याची तक्रार पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. विद्यार्थिनीला बोलावल्यानंतर शिपाई विठ्ठल चव्हाण याने प्रयोगशाळेच्या दरवाजाला बाहेरून कडी घातल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला असून या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे.