Mon, May 20, 2019 18:04होमपेज › Satara › सातारा आयडियल बनवणारच : खा. उदयनराजे

सातारा आयडियल बनवणारच : खा. उदयनराजे

Published On: Apr 10 2018 1:13AM | Last Updated: Apr 09 2018 11:53PMसातारा : प्रतिनिधी

स्व. श्री. छ. प्रतापसिंह ऊर्फ दादा महाराज यांचे स्वप्न पूर्ण करणार असून सातारा शहरातील घराघरात पाणी पोहचवण्याचे पुण्य मिळाले आहे. सातारकरांना 24 तास पाणी मिळण्यासाठी कास तलाव उंची वाढवण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. कोणत्याही परिस्थितीत सातारा शहर आयडीयल बनवणारच, असा विश्‍वास खा. श्री.छ. उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला.

मंगळवार पेठेतील कात्रेवाडा नवीन जलकुंभाच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर, बांधकाम सभापती मनोज शेंडे, नियोजन सभापती स्नेहा नलावडे, वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले,  जीवन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अभियंता राजेंद्र आदंट, माजी उपनगराध्यक्षा सौ. दिपाली गोडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

खा. उदयनराजे म्हणाले, साविआने निवडणुकीत दिलेले आश्‍वासन पूर्ण केले असून यामध्ये आजी माजी नगरसेवक, प्राधिकरण आणि पालिकेचे अभियंते यांना श्रेय जाते. कास धरणाची उंची वाढवल्यानंतर पुढील 30 ते 40 वर्षांचा पाण्याचा प्रश्‍न सुटणार आहे. नगराध्यक्षा सौ. माधवी कदम म्हणाल्या, साविआने दिलेल्या वचनांची पूर्तता होत असल्याचा आनंद आहे. कात्रेवाडा टाकीतून गवंडी आळी, कोल्टकर आळी, भटजी महाराज मठ, नागाचा पार, मंगळवार तळे परिसर या भागाला पुरेसे पाणी मिळणार आहे.

सौ. गोडसे यांनी या जलकुंभासाठी पाठपुरवा केल्यानेच हे काम झाले आहे. खा. उदयनराजे भोसले यांच्या आम्ही कोठेही कमी पडणार नाही.सातारा हे एक ऐतिहासिक शहर असून त्याचा वारसा जपण्याचे काम करु. सौ. गोडसे म्हणाल्या, खा. उदयनराजेंना या कामाचे श्रेय जाते. नवीन जलकुंभाचा प्रस्ताव पाठवल्यानंतर कमी वेळात चांगले काम झाले याचा आनंद होत आहे.