Sun, Sep 23, 2018 19:41



होमपेज › Satara › मटका अड्ड्याची माहिती पोलिसांना  दिल्याच्या रागातून हॉटेलमध्ये राडा

मटका अड्ड्याची माहिती पोलिसांना  दिल्याच्या रागातून हॉटेलमध्ये राडा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा





सातारा : प्रतिनिधी

मटका व्यवसायाची माहिती पोलिसांना दिल्याच्या कारणावरून रविवारी सायंकाळी आठ जणांनी एमआयडीसीतील कल्याण रिसॉर्टमध्ये घुसून तोडफोड केली. या टोळक्याने मॅनेजर प्रकाश भोईटे यांना मारहाण केली. याप्रकरणी अमर बनसोडेसह आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, मटका व्यवसायिकांनी राडा केल्याने खळबळ उडाली आहे.

अजंठा चौकातील हॉटेल प्रीतीच्या पाठीमागे सुरू असणार्‍या मटका अड्ड्यावर चार दिवसांपूर्वी सातारा पोलिसांनी छापा टाकून त्या ठिकाणी असणार्‍या साहित्याची तोडफोड केली होती. याप्रकरणी अमर बनसोडे, मनोज बनसोडेसह इतरांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्या ठिकाणी सुरू असणार्‍या अड्ड्याची माहिती कल्याण रिसॉर्टमधून पोलिसांना देण्यात येत असल्याचा संशय बनसोडे व इतरांना  होता. 

याच संशयावरुन रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास अमर बनसोडे, मनोज बनसोडे (रा. वनवासवाडी) हे इतर साथीदारांसमवेत  कल्याण रिसॉर्टमध्ये गेले. संशयितांनी हॉटेलच्या काउंटरवर असणार्‍या प्रकाश भोईटे यांना उद्देशून शिवीगाळ करत ‘तुम्ही आमच्या धंद्याची माहिती पोलिसांना देता, त्यामुळे कारवाई होते, आमच्या अड्डा तोडला आहे’, असे म्हणत तोडफोड करण्यास सुरुवात केली. तोडफोड करतानाच त्यांनी भोईटे यांना मारहाण केली. यावेळी त्याठिकाणी मयुर आनंदराव कणसे (रा. संभाजीनगर) हे आले व त्यांनी भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी मयुर कणसे यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
 






  •