Thu, Jul 18, 2019 12:28होमपेज › Satara › सातारचा केदार देशमुख राष्ट्रीय  फुटव्हॉली स्पर्धेत चमकला

सातारचा केदार देशमुख राष्ट्रीय  फुटव्हॉली स्पर्धेत चमकला

Published On: Feb 16 2018 1:50AM | Last Updated: Feb 15 2018 7:21PMसातारा : प्रतिनिधी

केरळ येथील कोयकँड बीचवर झालेल्या राष्ट्रीय फुटव्हॉली चॅम्पियनशिप स्पर्धेत कळंबे ता. सातारा येथील केदार राजकुमार देशमुख या डायस युनायटेड स्पोर्ट क्लबच्या खेळाडूने मुंबई उपनगर विभागातून चमकदार कामगिरी केली असून त्याची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. सहाव्या राष्ट्रीय फुटव्हॅाली स्पर्धेत देशातून अनेक राज्यातील खेळाडूंनी सहभाग घेतला. केरळच्या सुमद्र किनारी या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी बाजी मारली. प्रशिक्षक व राष्ट्रीय खेळाडू क्याजेटन डायस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र संघाने दुसरा क्रमांक मिळवला. यामध्ये संकेत जायजोडे, सुरज टेमकल, पृथ्वीराज चव्हाण, श्रेयस कुडाळे, आर्यन आडीवरेकर, सौरभ सूर्यवंशी, दिगंबर खरात, लोणारी या दहा खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली.

यामध्ये सातारच्या केदार देशमुख यांची निवड झाली आहे. जागतिक पातळीवर महाराष्ट्र संघाला 25 वे रँकींग मिळाले आहे. प्रशिक्षक डायस यांचे मार्गदर्शन व खेळाडुंचे परिश्रम यामुळे हे यश मिळाले असून सातार्‍यातील खेळाडूंना आता राष्ट्रीय स्तरावर चकमकण्याची संधी मिळाली आहे. या यशस्वी कामगिरी बद्दल खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, आ शिवेंद्रराजे भोसले, रेल्वेचे वरिष्ठ तिकीट तपासणीस प्रेमानंद जगताप-सायगावकर, पं स. सदस्या सौ सरिता इंदलकर, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी लक्ष्मण माने व मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.