Thu, Apr 25, 2019 23:51होमपेज › Satara › भानगडबाज वापरतात गैर मार्गाने ‘किट’

भानगडबाज वापरतात गैर मार्गाने ‘किट’

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

कोंडवे गावच्या हद्दीत बेकायदा गर्भपाताची औषधे सापडल्यानंतर दररोज त्याबाबतची नवनवीन माहिती समोर येवू लागली असून गैरकृत्य केल्यानंतर भानगडबाज एमटीपी या कीटचा गैरवापर करतात. एमटीपी किट मेडिकलमधून कोणाला दिले जाते याची नोंद व त्याचे बिल ठेवणे अत्यावश्यकच असताना त्याबाबत मात्र ‘भोंगळ’ कारभार होत असल्याचे समोर आले आहेे. दरम्यान, गुन्हा दाखल असलेले तिन्ही संशयित कुठे कामाला होते? याबाबतची माहिती पोलिस घेत आहेत.

एमटीपी किट हे सर्वसाधरणपणे  बहुतेक मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध असते. एखाद्या स्त्रीरोग तज्ञ (गायनाकॉलिजिस्ट) डॉक्टरने जर रुग्णाला किंवा त्याच्या नातेवाईकाला गर्भपात औषधाची चिठ्ठी (प्रिस्कीप्शन) दिली तर तो ग्राहक ज्या मेडिकलमधून ती औषधे घेतो त्या मेडिकल चालकाने त्या चिठ्ठीची नोंद ठेवून तसेच त्या किटचे बिल करुन ठेवणे अत्यावश्यक आहे. गर्भपात  करण्यासाठी लागणारे एमटीपी हे किट ग्राहकाने घेतल्यानंतर ज्या डॉक्टरकडे औषधोपचार सुरु आहे ते औषध खाण्याबाबतची माहिती देतात. एमटीपी या किटमध्ये एकूण 5 गोळ्या असतात. एक गोळी खाल्ल्यानंतर दुसर्‍या दोन गोळ्या 24 तासानंतर खायच्या. या तीन गोळ्या खाल्ल्यानंतरही गर्भपात झाला नाही तर पुढील 24 तासाने राहिलेल्या दोन गोळ्या खायच्या व त्याद्वारे गर्भपात होतो.

डॉक्टरकडे गेल्यानंतर ही सर्व प्रक्रिया करण्यासाठी साधारण 5 ते 10 हजार रुपयांचा खर्च होतो. वास्तविक एमटीपी या किटची किंमत 500 रुपयांपर्यंत आहे. मात्र ते किट रितसर घ्यायचे झाल्यास डॉक्टरकडे जावे लागते. मग तो डॉक्टर रुग्णाची तपासणी करुन रुग्ण सक्षम, असक्षम आहे नाही पाहून प्रसंगी अ‍ॅडमिट करुन घेवून त्याचे रेकॉर्ड ठेवून औषधे मागवून गर्भपाताची प्रक्रिया करतो. मात्र जे भानगडबाज आहेत त्यांना रेकॉर्ड ठेवणे, अ‍ॅडमिट होणे व डॉक्टरांकडून जावून ते औषध मेडिकल स्टोअरमधून रितसर घेणे यामुळे ‘उघडे’ पडणार असल्याने ते टाळण्यासाठी बेकायदा एमटीपीचे किट मिळवण्यासाठी धडपड सुरु होते.

कोंडवे येथील औषध साठ्याप्रकरणी सुरुवातीला एकूण चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. विजय प्रकाश संकपाळ, अमिर महमूद खान (दोघे रा. हिरापूर, कोंडवे), प्रशांत नामदेव शिंदे (रा.अंबेदरे रोड) व विलास पांडूरंग देशमुख (रा.मलकापूर) अशी त्यांची नावे आहेत. यातील विलास देशमुख हा मुख्य सूत्रधार असल्याची शक्यता आहे. यातील तिघेजण सातार्‍यातील कामगार असून मुख्य संशयिताने या तिघांना हाताशी धरुन एमटीपीच्या किटचा बाजार मांडल्याचे समोर येत आहे. यामुळे यातील इतर तीन संशयित हे सातार्‍यात कुठे कामाला होते? याचा पोलिस शोध घेत असून त्यातील सत्यता पडताळणार आहेत.

दरम्यान, बेकायदा गर्भपात औषध साठाप्रकरणी अटक झालेला प्रवीण उर्फ बाळासाहेब तुकाराम देशमुख (वय 38, रा.मंगळवार पेठ) हा त्याच परिसरातील अपूर्व या मेडिकलमध्ये कामाला असल्याचे समोर आले आहे. सध्या हा पोलिस कोठडीत असून पोलिस कसून चौकशी करत आहेत. संशयित ज्या मेडिकलमध्ये कामाला होता त्या मालकाकडेही पोलिस चौकशी करत असून अद्याप चौकशी संपलेली नाही. यामुळे चौकशीचा अधिक वृत्तांत समजू शकला नाही.
 

 

 

 

tags ; Satara,news,Illegal,abortion, medicines,Kondave, Village,border,


  •